
Bhanadara News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नशीब चांगलेच बलवत्तर असल्याचे दिसते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रयत्न फोल ठरले. ईव्हीएममध्ये पराभूत झाल्यानंतर ते पोस्टल मतांवर निवडून आले. आता भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फोडाफोडी करून काँग्रेसचे चार सभापती ईश्वर चिठ्ठीने निवडून आले आहेत.
नाना पटोले (Nana Patole) यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले आहे. भंडारा-गोंदियात त्यांनी आपला खासदार निवडून आणला. भाजपची यंत्रणा, मोदींचा जलवा आणि सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल असतानाही भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना पराभवाचा धक्का बसला. नाना पटोले यांनी दिलेले जवळपास सर्वच उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले.
चंद्रपूर, गडचिरोलीतही त्यांनी भाजपला (Bjp) पराभवचा धक्का दिला. त्यामुळे नाना पटोले यांचे राजकीय वर्चस्व संपवण्यासाठी भाजपच्यावतीने मोठे प्रयत्न केले. विधानसभेच्या निवडणुकीत सगळे हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला. स्वतः प्रफुल पटेल यांनी आपला उमेदवार भाजपला दिला. संपूर्ण महायुती एकत्र लढत असतानाही पटोले थोडक्यात का होईना निवडून आले. त्या पाठोपाठ नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा अध्यक्ष बसवला. आता सभापतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांवर पुन्हा मात केली आहे.
काँग्रेसकडे असलेल्या संख्याबळ बघता भंडारा जिल्हा परिषदेवर चार सभापती निवडून येणे अवघड असल्याचा अंदाज पटोले यांना आधीच आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला त्यांनी गळला लावले. यापैकी तिघांना सभापतीही देऊन काँग्रेसची सत्ता स्थापन केली.
भंडारा जिल्हा परिषदमध्ये विषय समितीच्या चार सभापतीपदाची निवडणूक पार पडली. यातील चारही सभापती हे ईश्वरचिठ्ठीने निवडून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषद एकूण ५१ सदस्यांची आहे. काँग्रेसचे २१ सदस्य निवडून आले होते. पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांना गळाला लावले. एवढी टोकाची परिस्थिती असताना भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. त्यामुळे आघाडी आणि महायुतीची २५-२५ अशी सदस्य संख्या झाली होती. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. ईश्वराने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.
समाजकल्याण सभापती : शीतल राऊत (काँग्रेस), बांधकाम सभापती : नरेश ईश्वरकर (राष्ट्रवादी काँग्रेस), महिला व बालकल्याण सभापती : अनिता नलगोपुलवार (राष्ट्रवादी काँग्रेस), शिक्षण व आरोग्य सभापती : आनंद मलेवार (राष्ट्रवादी काँग्रेस) हे सभापती पटोले यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.