Devendra Fadnavis,Navneet rana
Devendra Fadnavis,Navneet ranaSarkarnama

Navneet Rana News: ''...पण आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री !''; भाजपनंतर नवनीत राणांचंही पोटातलं आलं ओठावर

Navneet Rana On Devendra Fadnavis: फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे.
Published on

Navneet Rana On Devendra Fadnavis: राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली आहे. आता यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत असं विधान केलं आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपनं आपली उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारसभेत नवनीत राणा(Navneet Rana) बोलत होत्या.

Devendra Fadnavis,Navneet rana
Devendra Fadnavis News: "मंत्री जेलमध्ये असूनही राजीनामा नाही, म्हणून आम्ही मंत्र्यांनाच बदललं!"

यावेळी राणा म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडलं मग ते गुजरात असो वा गोवा तिथे भाजपला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते.

त्यांची समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत असे कौतुकोद्गार खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल काढले आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते.

Devendra Fadnavis,Navneet rana
Ajit Pawar News : पाणी मुरतंय कुठं ? चारशे कोटींची योजना २८०० कोटींवर गेली कशी ?

आघाडी सरकारच्या काळात वर्क फ्रॉम जेलही पाहिलं!

"सहा महिन्यांपूर्वी आपलं सरकार आलं. मात्र, मागील अडीच वर्षात सरकार बंदीस्त होतं. ते फेसबुक वर ते लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेमध्ये सरकार कुठे दिसायचंच नाही. मागील सरकारची वसुलीच दिसायची, मंत्र्यापासून ते अधिकारी जेलमध्ये गेले. वर्क फ्रोम होम आपण पाहिलं होतं, त्या सरकारमध्ये वर्क फ्रोम जेल सुद्धा आपण पाहिलं. मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिम्मत नव्हती की, त्यांचा राजीनामा घ्यावा. शेवटी आपल्याला सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले," असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com