Navneet Rana : लोकसभेच्या पराभवानंतर नवनीत राणा पुन्हा मैदानात; आता मुकाबला थेट पश्चिम बंगालमध्ये, तोही ममतादीदी विरोधातच...

Waqf Board Amendment Bill Latest Update : मोदी सरकारनं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. सत्ताधारी एनडीए सरकारनं विरोधी पक्ष आणि अनेक मुस्लिम संघटनांच्या विरोधाला न जुमानता, लोकसभेत 3 एप्रिल रोजी आणि राज्यसभेत 4 एप्रिल रोजी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.
Navneet Rana On Mamata Banerjee.jpg
Navneet Rana On Mamata Banerjee.jpgSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News: मोदी सरकारनं सादर केलेले वक्फ दुरुस्ती विधेयक काही दिवसांपूर्वीच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते.पण या विधेयकाला आता तीव्र विरोध दर्शवला जात आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांसह मुस्लिम समाजाकडूनही वक्फ बोर्ड विधेयकाला कडाडून विरोध करण्यात येत आहे. यातच पश्चिम बंगालमध्येही वक्फ बोर्ड विधेयकावरुन हिंसाचार उफाळला आहे. याचदरम्यान, भाजपच्या महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममतादीदींना भिडण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजपकडून वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना घेरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मुर्शिदाबाद येथे वक्फ बोर्ड विधयेकावरुन उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्याचमुळे ममतादीदींच्या सरकारकडून या हिंसाचाराला कुठेतरी बळ मिळत असल्याचा आरोप प.बंगालमधील भाजप नेत्यांकडून केला जात आहे.याचवरुन आता माजी खासदार नवनीत राणा मैदानात उतरल्या आहेत.

भिवंडीत भाजपच्या महिला नेत्या नवनीत राणा यांनी मीडियाशी सोमवारी(ता.14) संवाद साधला. त्या म्हणाल्या, ममतादीदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यापासून हिंदूंवर अत्याचार केले आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात. जेणेकरून हिंदुत्ववादी विचारांना रोखता येणार असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

Navneet Rana On Mamata Banerjee.jpg
Karuna Sharma Big News: वाल्मिक कराडच्या सुपारीबाबतचा दावा खरा...; करुणा शर्मा- मुंडेंनी दिली 'ही' मोठी धक्कादायक माहिती

तसेच हिंदुत्वाला विरोध करून एवढे वर्ष ममता दीदी सत्तेवर बसल्या आहेत. बांगलादेशात ज्याप्रमाणे हिंदूंना हाकलून दिले जाते. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीसुद्धा तसे करू पाहत आहेत. पण,आता देशात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्याचमुळे,त्यांचा प्रयत्न अपयशी होणार असल्याचा दावाही माजी खासदार राणा यांनी केला आहे.

गरज पडली तर आपल्यासह हजारो हिंदुत्व विचारांचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल येथे जाऊन ममतादीदी यांना त्यांची जागा दाखवतील. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा घमंड आहे, त्यांना रामभक्त कधी पचनी पडत नसल्याची सडकून टीकाही केली आहे.

Navneet Rana On Mamata Banerjee.jpg
BJP national president : जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच कधी सुटणार?

मोदी सरकारनं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. सत्ताधारी एनडीए सरकारनं विरोधी पक्ष आणि अनेक मुस्लिम संघटनांच्या विरोधाला न जुमानता, लोकसभेत 3 एप्रिल रोजी आणि राज्यसभेत 4 एप्रिल रोजी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं 288 आणि विरोधात 232 मतं पडली. तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं 128 आणि विरोधात 95 मतं पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com