Navneet Rana Vs NCP : अजितदादांना मर्यादेत बोलण्याचा सल्ला देणाऱ्या नवनीत राणांची राष्ट्रवादीने काढली लायकी; ‘त्या आता कशा निवडून येतात, हेच पाहू’

MLA Sanjay khodke Warning : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आरोपांमुळे महायुतीत तणाव वाढला आहे. नवनीत राणा आणि राष्ट्रवादी आमदार संजय खोडके यांच्यातील इशाऱ्यांनी भाजप–राष्ट्रवादी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Navneet Rana-Ajit Pawar-Sanjay Khodke
Navneet Rana-Ajit Pawar-Sanjay KhodkeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 05 January : राज्यातील सत्तेत एकत्र असणारे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वार-पटलवार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील सभेतून केलेल्या आरोपामुळे भाजप चांगलाच दुखावल्याचे दिसून येत आहे. त्यातच माजी खासदार नवनीत राणा यांनी अजितदादांना उद्देशून मर्यादा सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंनी राणांची लायक काढत त्या येणाऱ्या काळात कशा निवडून येतात, हे आम्ही पाहू, असा गर्भित इशारा दिला आहे.

महापालिका निवडणुकीवरून विरोधकांऐवजी महायुतीमधील नेत्यांमध्येच खडाजंगी सुरू झाली आहे. राज्यात आपण सत्तेत आहोत, एकत्रित बसले आहोत, याचाही विसर अनेकांना पडला आहे. अमरावती महापालिकेच्या आखाड्यात भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांच्यात वाक्‌युद्ध रंगले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांना नाहक सल्ला देण्याच्या भानगडीत पडल्यामुळे नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच भडकले आहेत. लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी रोखले नसते, तर तुम्ही अमरावतीच्या खासदार झाल्याच नसत्या, अशा शब्दात त्यांना खोडके यांनी सुनावले. तुम्हाला एकदा आम्ही निवडून आणले. ती आमची चूक झाली. पुढच्या काळात आम्ही बघून घेऊ, असा इशाराही खोडके यांनी राणा यांना दिला.

महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा महायुतीने केली होती. मात्र काही महापालिकांमध्ये युती होऊ शकली नाही तर काही ठिकाणी ठरवून करण्यात आलेली नाही. अमरावती महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

आपसात लढत असताना एकमेकांवर टिकाटिपणी करायची नाही, मनभेद व मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र नेते एकमेकांवर पातळी सोडून आरोप करताना दिसत आहेत.

Navneet Rana-Ajit Pawar-Sanjay Khodke
Mumbai High Court : बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद जाणार? मनसेची कोर्टात धाव; निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले!

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकमेकांना भ्रष्टाचारी म्हटले आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना नवनीत राणा यांनी या वादात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नयेत, शब्द जपून वापरण्याचा सल्ला नवनीत राणांनी दिला. त्यामुळे दादांचे समर्थक चांगलेच भडकले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा आमदार खोडके यांनी समाचार घेतला.

नवनीत राणा यांची खासदार होण्याची लायकी नव्हती. अजित पवार यांनी साथ दिल्यामुळे त्या लोकसभेत पोहचल्या. राणा यांनी आरोप करताना आपली पात्रता बघावी. त्यावेळी मला अजितदादा यांनी रोखले नसते, तर राणा खासदार होऊ शकल्या नसत्या. आमची चूक झाली. नवनीत राणा यांना निवडून आणले. मात्र पुढच्या काळात त्यांना बघून घेऊ असा इशाराही संजय खोडके यांनी दिला आहे.

Navneet Rana-Ajit Pawar-Sanjay Khodke
Priyanka Gandhi News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय; प्रियांका गांधी मिळवून देणार सत्ता?

विशेष म्हणजे नवनीत राणा यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही विरोध आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत युवा स्वाभिमानी पक्षासोबत युती करण्यासही भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com