
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत नेहमीच दुसऱ्यांच्या घरात डोकावतात. दुसऱ्याचे नाव ठेवून बाराशाचा प्रसाद खात असतात. त्यापेक्षा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत काय सुरू आहे, कोण कुठल्या पक्षात जाणार आणि काय काय वाटाघाटी सुरू आहेत या विषयावर सामानातून एखादा अग्रलेख लिहावा असा टोला नितेश राणे यांनी त्यांनी लागावला.
सामन्यातील अग्रलेखात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा खडूस असा उल्लेख केला. यावर राणे यांनी संजय राऊतांचे स्वतःच्या पक्षातील स्थान काय, मालकाच्या पक्षात किती वेळ राहणार याबद्धलही रोज सकाळी उठून बोलावे असे सांगितले. उबाठात असलेली अस्वस्थता मातोश्रीवर जाऊन कधीतरी विचारावे असे सांगून राणे यांनी तेच किती काळ उद्धव ठाकरे सेनेमध्ये राहतात याचे दिवस मोजावे असाही सल्ला दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अद्यापही वर्षा बंगल्यावर मुक्कामाला गेले नाहीत. त्यांना कशाची भीती वाटते, कुठे कुठे लिंबू फोडले, काळी जादू केली असा सवालही संजय राऊत यांनी केला होता. यावरीही नितेश राणे यांनी मोतोश्रीने मुख्यमंत्रीपदासाठी किती उपास-तापास केले, लिंबांचे तोरण बांधले याचीही माहिती महाराष्ट्राला द्यावी असा सल्ला दिला. संजय राजाराम राऊत यांना आता गांभीर्याने कोणी घेत नाही. सामना सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो. सामना हे वृत्तपत्र शिवसैनिकसुद्धा वाचत नाही. ते आता काँग्रेसचेच मुखपत्र जास्त झाला आहे. सामनाची दखल घेण्याची गरज नाही असेही राणे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच भाषणात बांगलादेशी आणि रोहिंग्या संदर्भात स्पष्ट टोकाची भूमिका घेतली. बांगलादेशी कीड आणि घाण त्यांच्या बेड्यापर्यंत सोडण्याचे काम सुरू आहे. त्यांना भारतात आणणारे बाप आणि अब्बा कोण आहे यावर सर्वांचे लक्ष आहे. बांगलादेशी रोहिंगे हे महाराष्ट्रात दिसणार नाही त्यांना ठेचून ठेचून इथून हकलू असाही दावा नितेश राणे यांनी केला.
आमदार संजय सिरसाट यांनी शिवसेनेच्या एकीकरणाची मागणी करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांचे काय मत आहे. याचा आधी विचार करावा. ते आमचे मित्र आहेत. मात्र त्यांनी संजय राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.