
Nagpur, 03 February : वर्षा बंगल्यावर राहायला जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशाची भीती वाटते, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे, तर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर लिंबू, मिरच्या सापडल्या होत्या, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे बर्षा बंगल्यावरच्या काळ्या जादूची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यावर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उद्धव ठाकरे, रामदास कदम असो वा संजय राऊत, एकनाथ शिंदे हे सर्वच शिवसेनेतील बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांची गुपिते माहिती असावीत आणि काळ्या व पांढऱ्या जादूची त्यांना चांगली माहिती असावी, असो टाला लागवला.
महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या चाळीस आमदारांना घेऊन आसाममधील कामाख्या देवीला गेले होते. तेथून आल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून काळ्या जादूची चर्चा सातत्याने सुरू असते. संजय राऊतांमुळे त्याला पुन्हा फोडणी मिळाली आहे. यावरून वडेट्टीवारांनी ते सगळेच काळे जादूवाले असतील, म्हणून त्यांना एकमेकांचे गुपित माहीत असावे, अशी शंका व्यक्त केली. उद्धव ठाकरे, रामदास कदम, एकनाथ शिंदे , संजय राऊत हे सर्व शिवसेनेचे मोठे नेते आहेत. या सर्वांना काळी जादू, पांढरी जादू याची माहिती असावी, असेही ते म्हणाले.
गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. बीड प्रकरणाला जो जातीय रंग दिला जातोय, तो योग्य नाही. सरकारने निष्पक्ष चौकशी करावी, जो कोणी आरोपी असेल, त्याच्यावर कारवाई करावी. प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना बोलायची गरज नाही. एखाद्या घटनेला समाजावर नेणे चुकीचे आहे. देशमुख असतील किंवा वाल्मिक कराड पाठिराख्यांनी जातीच्या ढाली पुढे करू नये. येथील गुन्हेगारीमुळे सर्वत्र बीडचे उदाहरण दिले जाते. पूर्वी बिहार म्हणायचे आता बीड म्हणयाला लागले आहेत.
मंत्री नीतेश राणेंनी घटना वाचलेली नाही. घटनेवर राणेंचा विश्वास असता तर ते असे काही बोलले नसते. त्यांना देश मनुस्मृतीच्या भरोशावर चालवायचा आहे की राज्यघटनेप्रमाणे चालवायचा आहे, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होत असेल, तर हे संविधानाचा आणि मंत्रिपदाचा अवमान असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.