Lok Sabha Election 2024 : धीरगंभीर चेहऱ्याने मोदींनी स्वीकारले गडकरींकडून हास्य मुद्रेतील स्वागत

Narendra Modi : तेलंगणाला जाण्यापूर्वी साधला महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी संवाद. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
Nitin Gadkari & Narendra Modi
Nitin Gadkari & Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : वेगवेगळ्या विकासकामांच्या लोकार्पणासाठी तेलंगणात रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची भेट घेतली. नागपूर विमानतळावर पंतप्रधान मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. भाजपची लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत पंतप्रधान मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोदी प्रथमच नागपुरात आलेत. त्यामुळे गडकरी यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

तेलंगणाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी (ता. चार) नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. या वेळी मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांशी काही वेळ चर्चा केली. नागपुरात भाजपचा महामेळावा होत आहे. तरुणाईला साद घालण्यासाठी नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी आदी त्याला उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari & Narendra Modi
Nitin Gadkari : नितीन गडकरी अचानक खर्गे, जयराम रमेश यांच्यावर का चिडले?

उपराजधानीत होत असलेल्या नमो युवा राष्ट्रीय संमेलनाच्या तयारीबाबत प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. देशभरातील युवा भाजप कार्यकर्त्यांना या महासंमेलनात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संमेलनाचे स्वरूप बावनकुळे यांनी पंतप्रधानांना विशद केले.

पश्चिम विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा केंद्रीय मंत्री अमित शाह हे मंगळवारी (ता. चार) अकोल्यात आढावा घेणार आहेत. त्यासंदर्भातही बावनकुळे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. लवकरच लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. मात्र, देशात सर्वात प्रथम उमेदवार यादी जाहीर करीत भाजपने आपली तयारी असल्याचे सिद्ध केले आहे. ‘अबकी बार चारसौ पार’ असा भाजपचा नारा आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.

निवडणूक उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना त्यातून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आल्याने भाजपच्या वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, मोदी-गडकरी यांच्या सोमवारी झालेल्या भेटीत यासंदर्भात विमानतळावर उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याच्या चेहऱ्यावर प्रतिक्रियेचे भाव नव्हते. नेहमीप्रमाणे गडकरींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव होते. विमानातून बाहेर येताच गडकरींनी सर्वांत प्रथम मोदींना अभिवादन केले. पंतप्रधानांनी गंभीर मुद्रेत त्यांचे अभिवादन स्वीकारले.

Edited By : Atul Mehere

R

Nitin Gadkari & Narendra Modi
Nitin Gadkari News : नितीन गडकरी म्हणाले, मला आजकाल आमदार, खासदार भेटायला येत नाहीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com