Nitin Gadkari News : चार वर्षे पायपीट केल्यानंतर नोकरी मिळाली, अन् गडकरींसमोर माय-लेकाच्या अश्रुंचा बांध फुटला !

Nagpur : या तरुणाच्या आईने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात येऊन भेट घेतली.
Nitin Gadkari
Nitin GadkariNagpur
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari is strict about discipline : सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशा पद्धतीने शासकीय कार्यालयातील कामे होतात. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यासच कामांना वेग येतो. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी याबाबतीत शिस्तीचे कडक आहेत. प्रशासनावर त्यांचा वचक आहे. याचा अनुभव लोक नेहमीच घेत असतात. (Nitin Gadkari's follow up finally got the job)

अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी चार वर्षांपासून हालअपेष्टा सहन केलेल्या एका तरुणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर नोकरी मिळाली. या तरुणाच्या आईने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात येऊन भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. ‘साहेब, तुमच्यामुळे कुटुंब सावरले’ असे म्हणत तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात भर पावसात रविवारी नेहमीप्रमाणे मागण्यांसाठी गर्दी करणाऱ्यांसोबतच काम झाले म्हणून ‘आभार’ मानणाऱ्यांनीही भेट घेतली. ललित धुर्वे याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करीत होता. चार वर्षे काहीच झाले नाही.

अखेर काही दिवसांपूर्वी ललित व त्याच्या आईने गडकरी यांची भेट घेतली आणि कैफियत मांडली. दरम्यान, काही दिवसांमध्ये ललितला नोकरी मिळाली. आज नागपुरात (Nagpur) जनसंपर्क कार्यक्रमात तो आईसोबत आला आणि गडकरींचे आभार मानले. आईच्या डोळ्यांतील अश्रू बघून मुलालाही गहिवरून आले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari Threat Case: तुरुंगातून चालवत होता स्लिपर सेल; गडकरींना धमकी देणाऱ्या पाशाबाबत धक्कादायक माहिती समोर

दिव्यांग, रुग्णांना मदतीचा हात

जनसंपर्क कार्यक्रमात कृत्रिम हात व पायाच्या मागणीसाठी विदर्भातील (Vidarbha) काही दिव्यांग बांधवांनी गडकरी यांची भेट घेतली. कर्करोगग्रस्त तरुणी, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचे पालक, रोजगाराची जिद्द ठेवून ई-रिक्षाची मागणी करणारा दिव्यांग आदींनी भेट घेतली. गडकरींनी त्यांना मदतीचा विश्वास देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना दिल्या. डॉ. बी. ओ. तायडे यांना काही दिवसांपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे यावेळी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.

खेळाडूंचे कौतुक

आठ राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणारी मृणाली बानाईत व तिचा भाऊ श्रूमल बानाईत यांचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कौतुक केले. दोन्ही योगपटूंना पदक प्रदान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मृणाली बानाईत हिने दोनवेळा ‘खेलो इंडिया’मध्ये दमदार कामगिरी केली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.