Nitin Gadkari News : गडकरींनी फडणवीसांसमोरच सांगितला शरद पवारांचा मोठेपणा; नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari Latest News : संभाजीनगर-नगर-पुणे असा 230 किलोमीटर महामार्ग बांधण्याचं प्रस्तावित आहे. याचा सामंजस्य करार नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला.
nitin gadkari sharad pawar devendra fadnavis
nitin gadkari sharad pawar devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. आता शरद पवारांबद्दलचा ( Sharad Pawar ) असाच एका किस्सा नितीन गडकरींनी सांगितला आहे. "युती सरकारनं बांधलेल्या मुंबई-पुणे महामार्गापासून 'एमएसआरडीसी'ला पाहिजे तसा लाभ मिळाला नाही. पण, राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार आल्यानंतर शरद पवारांनी मला फोन करून 'एमएसआरडीसी' जिवंत राहिली पाहिजे, असं सांगितलं. मग, मी एक मॉडेल तयार केलं आणि जुन्या महामार्गाला नवीन महामार्ग जोडला, असं नितीन गडकरींनी म्हटलं.

nitin gadkari sharad pawar devendra fadnavis
Balasaheb Thorat News : ...अन् संयमी थोरात जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले; नेमकं काय घडलं?

संभाजीनगर-नगर-पुणे असा 230 किलोमीटर महामार्ग बांधण्याचं प्रस्तावित आहे. हा महामार्ग राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हा रस्ता बांधणार आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आणि राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात शुक्रवारी ( 8 मार्च ) नागपूरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी केंद्रीय नितीन गडकरी ( Nitin Gadkari ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी नितीन गडकरी म्हणाले, "युतीचं सरकार असताना आम्ही मुंबई ते पुणे महामार्ग उभारला. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. या महामार्गापासून 'एमएसआरडीसी'ला पाहिजे तसा लाभ मिळाला नाही. तेव्हा काय केले पाहिजे? असा प्रश्न सरकारला पडला. ही गोष्ट शरद पवारांना ( Sharad Pawar ) समजली. त्यांनी मला फोन करत म्हटलं, 'राजकारण बाजूला ठेव, 'एमएसआरडीसी' तुझे अपत्य आहे. ते जगले पाहिजे.' त्यानंतर मी एक मॉडेल तयार करत जुन्या महामार्गाला नवीन महामार्ग जोडला. त्याचा फायदा 'एमएसआरडीसी'ला झाला."

nitin gadkari sharad pawar devendra fadnavis
Raj Thackeray On Bjp : "माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात...", राज ठाकरेंचा भाजपला टोला

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुणे रिंग रोडची माहिती दिली. "पुणे रिंग रोडचं काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन झालं आहे. संभाजीनगर ते पुणे नवीन एक्स्प्रेस महामार्ग पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे संभाजीनगर मार्गे पुण्यात पोहाेचताना वाहतुकीची कोंडी अजिबात होणार नाही, याची काळजी आधीच घेण्यात आली आहे."

nitin gadkari sharad pawar devendra fadnavis
Raj Thackeray On Sharad Pawar : "राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी," राज ठाकरेंनी पवारांना डिवचलं

"रिंग रोडची लांबी 230 किलोमीटर आहे. त्यावरून धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रतितास एवढी असेल. रिंग रोडच्या प्रकल्पासाठी 3 हजार 752 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात येईल. हा महामार्ग पर्यावरणपूरक, नेट झिरो कार्बन आणि नेट पॉझिटिव्ह ऊर्जा प्रकल्प म्हणून बांधला जात आहे. रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

R

nitin gadkari sharad pawar devendra fadnavis
Loksabha Election 2024: रखडलेलं जागावाटप, मुख्यमंत्र्यांचं सूचक मौन; खासदारांना फुटला घाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com