Loksabha Election 2024: रखडलेलं जागावाटप, मुख्यमंत्र्यांचं सूचक मौन; खासदारांना फुटला घाम

Eknath Shinde Political News : एकीकडे भाजपकडून प्रत्येक लोकसभेत मतदारसंघात हालचाली गतिमान झाल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान खासदारांना प्रमोट करण्यासाठी साधा ब्रसुद्धा काढत नाहीत.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी कोल्हापूर दौरा पार पडला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक विकासकामांचा उद्घाटना समारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक लोकसभा मतदारसंघांतील पेरण्या भाजपकडून सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे विकासकामांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात आहेत. पण विद्यमान शिवसेना शिंदे गटाकडे असणाऱ्या जागांवरच मुख्यमंत्री शिंदे यांचे मौन आहे.

एकीकडे भाजपकडून प्रत्येक लोकसभेत मतदारसंघात हालचाली गतिमान झाल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान खासदारांना प्रमोट करण्यासाठी साधा ब्रसुद्धा काढत नाहीत. अशी परिस्थिती कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आहे. त्याची प्रचिती शुक्रवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पाहायला मिळाली.(Loksabha Election 2024)

हातकणंगले येथे झालेल्या दौऱ्यात कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक(Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हेदेखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान जागांवर शिंदे गटाचे उमेदवार असावेत, असा दबाव शिंदे गटाने भाजपवर केला आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा दबाव टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच कोड्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभेबाबत महायुतीचा उमेदवार कोण? असणार हे अद्याप स्पष्ट होत नसताना दोन्हीही विद्यमान खासदारांनी आपला दावा कायम ठेवला आहे.

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात 8,200 कोटी रुपयांचा तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांनी जवळपास 750 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे जाहीरपणे सांगतात. अशा परिस्थितीत या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन महिन्यांत दोन-तीन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मात्र, विद्यमान खासदारांविषयी निवडणुकीच्या बाबतीत एक शब्दही काढलेला नाही.

ही सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या दोन्ही मतदारसंघांवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला होता. दोन्हीही जागांवर यापूर्वी शिंदे गटाने दावा केला आहे. दोन्ही विद्यमान खासदारांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या या वृत्ताला ठाम विश्वास देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक शब्दही काढला नाही. हे दोन्ही खासदारांसाठी संकेत आहेत का अशी चर्चाही आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nana Patole At Pratapgad : प्रतापगडावर काय घडले? डॉ. पडोळेंच्या खांद्यावर नानांचा 'हात'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com