

NCP Leader Chagan Bhujal on OBC Reservation : कंत्राटी तत्त्वावर पदभरती होत आहे. या कंत्राटी पदभरतीतही आरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने दोन दिवसीय (ता. ३ व ४ जून) शिबिराचे आयोजन नागपुरातील महात्मा फुले सभागृहात करण्यात आले होते. याच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. (It was done at Mahatma Phule Hall in Nagpur)
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, हरी नरके उपस्थित होते. भुजबळ यांनी ओबीसींच्या जनगणनेवरून भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. जुन्या सरकारच्या काळात ते झाले. परंतु या मोदी सरकारने ते आकडे जाहीर केले नाही. ओबीसींचा इंपेरिकल डेटा फडणवीस सरकारच्या काळात एसीत बसून तयार करण्यात आला. त्यांच्या मते मुंबईत ओबीसीच नाही.
एससी, एसटीप्रमाणेच ओबीसीला निधी मिळाला पाहिजे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ओडिशा रेल्वे अपघातासंदर्भात ते म्हणाले, दुर्घटनेसाठी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ओबीसी सेलमध्ये बाळबुधे यांनी चांगले काम केले. भाकरी फिरवण्यासाठी त्यांना हटवून अध्यक्ष पदावर दुसऱ्याला नेमले. मात्र भाकरी पलटत असताना ती कच्ची राहू नये, हे बघितले पाहिजे. नाहीतर ती खाता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप इतिहास बदलत आहे..
भाजपकडून इतिहास बदलला जात आहे. शिवाजी महाराज यांना पुस्तकात फक्त अर्धा पान मिळणार असून फुले, आंबेडकरांना किती जागा मिळणार हा प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र सदनमधील पुतळा हटवला, त्याचा विरोध किती लोकांनी केला? नुसती भाषण करून काम होणार नाही तर प्रत्यक्षात काम करावे लागेल. पूजा करा अंधश्रद्धा पसरवू नका, असे ते म्हणाले.
ओबीसीसाठी शिवसेना सोडली..
त्याकाळात शिवसेना सोडणे सोपे नव्हते. कारण तिथे आत जाण्याचा दरवाजा होता, बाहेर येण्याचा नाही. पण मी याच नागपुरातून शिवसेना सोडली. मी शिवसेना ओबीसीसाठी सोडली, असा खुलासा भुजबळ यांनी यावेळी केला.
आधुनिक तंत्रज्ञान असताना दुर्घटना कशी?
ऐवढे आधुनिक तंत्रज्ञान असताना रेल्वेसारख्या दुर्घटना होतातच कशा. उड्डयणमंत्री असताना मीसुद्धा अनेक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. रेल्वे दुर्घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महापालिका निवडणूक झाल्या नाहीत, प्रशासन महापालिका चालवत आहे. त्यांच्यावर सरकारचा दवाब आहे. त्यांच्यानुसार ते चालतात आणि नुकसान जनतेचे होत आहे. निवडणुका जवळ येत आहेत. आजच्या सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. ओबीसी ज्यांच्या बाजूने असेल तो सत्तेत असेल. ओबीसी समाजाला एवढा लढा का लढावा लागतो, हा चिंतनाचा विषय आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
मोदींनी पलटी मारली..
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आधी ओबीसी जनगणनेच्या बाजूने होते. त्यांनी ठरावावर सही केली होती. मात्र आता त्यांनी पलटी मारली. ओबीसीच्या (OBC) विकासासाठी जनगणना आवश्यक आहे, हे प्लानिंग कमिशननेसुद्धा सांगितले आहे. भाजपकडे (BJP) ३१ टक्के ओबीसी मते आहेत आणि ते फक्त त्याचा वापर करतात, असे हरी नरके म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.