Mandal Yatra: शरद पवारांच्या मंडल यात्रेत शिरले पाकीट चोर! अनेक नेत्यांच्या खिशातून पाकिटं लंपास; शहराध्यक्षांनाच बसला मोठा फटका

Mandal Yatra: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मंडल यात्रेमध्ये एक अजब प्रकार घडला.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mandal Yatra: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मंडल यात्रेमध्ये एक अजब प्रकार घडला. काही पाकिटचोर या यात्रेत शिरले होते त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खिशातली पाकिटं चोरली तर काहींच्या खिशातली रोख रक्कमही लंपास केली. यामुळं एकच खळबळ उडाली असून एका पाकिटमाराला कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं आणि चांगलाच चोपही दिला.

Sharad Pawar
MNC-Congress: मनसेच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीच्या चर्चांना काँग्रेस लावणार फुलस्टॉप? आतल्या गोटात काय चर्चा सुरु?

नेमकं काय घडलं?

नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मंडल यात्रा रवाना झाली. पण जेव्हा ही यात्रा व्हरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर पोहोचली तेव्हा या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही पाकीटमारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांच्या खिशातून रोख रक्कम आणि पैशाचीप पाकीटं लंपास केली.

Sharad Pawar
ECI Counter Strike: राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं 'कमलनाथ प्रकरणा'नं उत्तर; सुप्रीम कोर्टाचा आदेश काय होता?

शरद पवार मंडल यात्रेसोबत व्हरायटी चौकात असताना असाच एक पाकीटमार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागला. तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याच्याकडून चोरलेलं पाकीट जप्त करत त्या पाकीटमाराला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Sharad Pawar
Sharad Pawar: राजकीय कुटनीती अपयशी ठरलेली नाही पण ट्रम्पवर...; अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या खिशातून या पाकिटमारांनी 20 हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com