Sunil Kedar : 'भाजपचे नेते माजलेत?, 'जिल्हाधिकाऱ्यांना मुजरा करायला लावू'; काँग्रेस नेते सुनील केदारांचे वादग्रस्त विधान

Sunil Kedar On BJP Over Vote theft : सध्या राज्यासह देशात ‘व्होट चोरी' चा मुद्दा चांगलाच जागत असून काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नागपुरमध्येही काँग्रेस नेत्यांनी भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Sunil Kedar
Sunil Kedar sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी भाजप आणि अधिकाऱ्यांवर वादग्रस्त विधान केले.

  2. त्यांनी भाजप नेते माजले आहेत आणि अधिकारी गुलाम झाले आहेत असे म्हटले.

  3. "भाजपवाल्यांना 2026 पाहूही देणार नाही" असा थेट इशारा दिला.

  4. कार्यकर्त्यांना "डरो मत" असा कानमंत्र देत एकजूट राहण्याचे आवाहन केले.

  5. या विधानामुळे नागपूर जिल्ह्यात भाजप-काँग्रेस वाद चिघळण्याची शक्यता.

Nagpur News : 'भाजपचे नेते माजले आहेत तर अधिकारी गुलाम झाले आहेत. मात्र तुम्ही घाबरू नका, तो दिवस आता दूर नाही. भाजपच्या नेत्यांना तुमच्या दारासमोर उभे करतो आणि गुलामगिरी करणारे जिल्हाधिकारी असो वा पोलिसावाले त्या सर्वांना तुमच्या समोर मुजरा करायला लावतो', असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी केले. 'तो दिवस आता दूर नाही. भाजपवाल्यांना 2026 पाहूही देणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. तसेच केदारांनी 'डरो मत', असा कानमंत्रही यावेळी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे आता नागपूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये नव्या वादाला सुरुवात होणार आहे. यावेळी त्यांनी कामठीच्या आमदारालाही इशारा दिला.

काँग्रेसच्या ‘व्होट चोर, गद्दी छोड' आंदोलनात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस विदर्भातील खासदार व आमदार उपस्थित होते.

Sunil Kedar
Sunil Kedar complaint : सुनील केदारांना आता काँग्रेसमधूनच 'फटाके'; सपकाळांकडे तक्रार...

यावेळी केलेल्या भाषणात केदार भाजपच्या आमदारांवर चांगलेच तुटून पडले. तत्पूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात देशात मध्यावधी निवडणूक होणार असल्याचा दावा करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. हाच धागा पकडून केदारांनी भाजपचे आमदार आणि नेते माजले असल्याचे सांगताना अधिकारी त्यांची गुलामगिरी करीत असल्याचा आरोप केला.

मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. तो दिवसही दूर राहिला नाही. दोन वर्षातच निवडणूक होणार आहे. या सर्व भाजपच्या आमदारांना तुमच्या दारात उभे केले नाही तर मी नावाचा सुनील केदार नाही. जे अधिकारी गुलाम झाले आहेत. मग तो कलेक्टर असो वा कमिशनर त्यांनाही मुजरा करायला लावतो.

कामठीपासून सर्वच आमदारांना बघून घेईन असा इशारा देऊन केदारांनी दिला. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डरो मत असेही आवाहन केले. आजच दिवस लक्षात ठेवा. सुनील केदार. मी जे बोललो तो दिवस तुम्हाला नक्कीच दाखवील. 2026 भाजपच्या नेत्यांना पाहू देणार नाही असाही दावा यावेळी केदारांनी केला.

Sunil Kedar
Sunil Kedar News: माजी मंत्री सुनील केदारांना मोठा झटका; जिल्हा बँकेपाठोपाठ आता बाजार समितीतील वर्चस्वही संपुष्टात येणार

FAQs :

प्रश्न 1: सुनील केदारांनी कोणते विधान केले?
➡️ त्यांनी भाजप नेते माजले आहेत आणि अधिकारी गुलाम झाले आहेत असे म्हटले.

प्रश्न 2: सुनील केदारांनी भाजपला काय इशारा दिला?
➡️ "भाजपवाल्यांना 2026 पाहूही देणार नाही" असे ठणकावले.

प्रश्न 3: कार्यकर्त्यांना त्यांनी काय संदेश दिला?
➡️ "डरो मत" असा कानमंत्र दिला.

प्रश्न 4: या विधानामुळे कुठे राजकीय वाद पेटला?
➡️ नागपूर जिल्ह्यात.

प्रश्न 5: सुनील केदारांनी कोणत्या आमदाराला इशारा दिला?
➡️ कामठीच्या आमदाराला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com