Vidhan Sabha Election : राजुऱ्यात लागले वामनराव चटप यांच्या ‘एकनिष्ठ’तेचे बॅनर

Rajura Constituency : विधानसभा मतदारसंघात पुन्हा रंगणार धोटे विरूद्ध चटप असा सामना
Wamanrao Chatap Posters
Wamanrao Chatap PostersSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Sabha Election : राज्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे पक्षनिष्ठा, विचारधारा याबाबी आता कालबाहय होये आहेत की काय असेच चित्र आहे. कोण कधी कोणत्या पक्षात उडी मारेल, याचा नेम नाही. एखाद्या विचारसरणीचा अवलंब करायचा अन् निरंतर आपली वाटचाल करायची असे उदाहरण दुर्मीळच झाले आहे. एकीकडे पक्षफुटी, नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात होत असलेले बदल अशी सारी स्थिती आहे. राजुऱ्यात मात्र एका नेत्याच्या ‘एकनिष्ठ’तेचे बॅनर झळकत आहेत. हे बॅनर आहेत राजुऱ्याचे माजी आमदार व ज्येष्ठ विदर्भावादी नेते वामनराव चटप यांचे.

वामनराव चटप यांच्या चाहत्यांनी चंद्रपुरातील राजुरा शहरात आपल्या नेत्याच्या ‘एकनिष्ठ’तेची बॅनरबाजी केली आहे. सध्या फुटाफुटीचे राजकारण सुरू आहे. अशात चटप हे गेल्या 43 वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले आहेत. त्यांना अनेकदा खासदार व मंत्रिपदाची ऑफर दिली गेली. पण त्यांनी कुठलीही तडजोड केलेली नाही. आजच्या कलुषित राजकारणात ते स्वाभिमानाने आपला लढा देत आहेत. जनतेच्या हितासाठी कायम लढा देणाऱ्या या नेत्याला आता सभागृहात पुन्हा पाठविल्याशिवाय पर्याय नाही, अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Wamanrao Chatap Posters
Chandrapur MIDC : विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या गावात एमआयडीसीची दैनावस्था

राजुरा विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लागले अन् पुन्हा एकदा वामनराव चटप विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्टच झाले. असे झाले तर 2019 मध्ये सुभाष धोटे विरूद्ध वामनराव चटप यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा बघायला मिळू शकणार आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तत्कालीन आमदार प्रभाकर मामुलकर यांनी हा गड अनेकदा शाबूत ठेवला. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदांच कुणी सुरूंग लावला असेल तर तो वामनराव चटप यांनी. चटप यांनी तब्बल तीनदा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून उभे होते. या निवडणुकीत सुभाष धोटे व भाजपचे संजय धोटे यांची थेट लढत होईल असे गणित मांडल्या जात होते. पण चटपांनी कमाल केली. त्यांनी सुभाष धोटे यांना अटीतटीची लढत दिली. मतमोजणीच्या 23व्या फेरीपर्यंत त्यांनी मतांची प्रंचड आघाडी घेतली होती. मात्र केवळ दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. भाजपचे संजय धोटे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते.

Wamanrao Chatap Posters
Chandrapur Protocol Dispute : पत्रिकेवर रातोरात आमदार धोटेंऐवजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले, कसे काय?

वामनराव चटप हे विदर्भवादी नेते आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा विदर्भाचा लढा सुरू आहे. अशात त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करीत वामनराव चटप पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास पुन्हा एकदा राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष धोटे विरूद्ध वामनराव चटप अशा सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते. राजुऱ्यात झळकत असलेल्या या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Wamanrao Chatap Posters
Chandrapur Latest News : भाजपच्या पाठिंब्याने सुनील फरकडे झाले बाजार समितीचे उपसभापती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com