Chandrapur Latest News : भाजपच्या पाठिंब्याने सुनील फरकडे झाले बाजार समितीचे उपसभापती

Election Process : लक्षणीय लढतीला मिळाले बिनविरोधचे रूप; कोठारीत आनंद
APMC Chandrapur.
APMC Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Latest News : चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला या पदासाठी भाजप गटातील पारस पिंपळकर व सुनील फरकडे यांच्यात कमालीची लढत होत असल्याचे चित्र होते. उपसभापतिपदासाठी दोघांनीही जबरदस्त फिल्डिंग लावली होती. कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली असतानाच निवडणूक बिनविरोध झाली. बाजार समितीचे संचालक सुनील फरकडे यांनी उपसभापतिपदावर बाजी मारली.

फरकडे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील कोठारी येथील रहिवासी असून ते विद्यमान उपसरपंचही आहेत. चंद्रपूरची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदाकरिता पार पडलेली निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजली. त्याला कारणही तसेच होते.

APMC Chandrapur.
Chandrapur : गाव तहानेने व्याकुळलेले, अशात महिला सरपंचांने केले असे काही की...

निवडणुकीत काँग्रेस व भाजप सत्तेसाठी एकत्र आली होती. काँग्रेसच्या एका गटाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे व भाजपचे देवराव भोंगळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सत्ता आणली. त्यानंतर काँग्रेसचे गंगाधर वैद्य यांची सभापतिपदी वर्णी लागली. उपसभापतिपदी भाजपचे गोविंदा पोडे यांची निवड करण्यात आली होती. बाजार समितीच्या या निवडणुकीनंतर भाजप व काँग्रेस नेत्यांनी एकमेकांचे हातात हात घेऊन केलेला डान्स चांगलाच चर्चिला गेला होता. या डान्सनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. बाजार समितीत सत्तास्थापना झाली. अशात नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी नदीपात्रात उतरलेल्या उपसभापती गोविंदा पोडे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर उपसभापतिपदाची निवडणूक 24 जानेवारीला घेण्याचा कार्यक्रम निर्धारित करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपसभापतिपदाकरिता सत्ताधारी गटातील उमेदवार आमने-सामने उभे ठाकले होते. यात कोठारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व विद्यमान बाजार समिती संचालक सुनील फरकडे, धानोरा येथील पारस पिंपळकर यांच्यासोबत आमडी येथील अनिल मोरे यांचेही नाव पदासाठी घेतले जात होते. मात्र ऐनवेळी निवडणूक बिनविरोध झाली.

चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मोठा आहे. बाजार समितीत एकूण 18 संचालक आहेत. त्यापैकी काँग्रेस व भाजप या सत्ताधारी गटाकडे 11 संचालक आहेत. काँग्रेसच्या दिनेश चोखारे यांच्या गटाकडे 6 संचालक आहेत. बहुमत असल्याने सत्ताधारी गटाकडेच उपसभापतिपद राहणार हे स्पष्ट होते. यात अनेक उमेदवारांनी उपसभापतिपदासाठी फिल्डिंग लावल्याने लढत रंगतदार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

APMC Chandrapur.
Chandrapur : अख्ख्या गावाने केली पोलिस अधिकाऱ्यावर पुष्पवृष्टी, कारण...

ऐनवेळी भाजपने या पदासाठी सुनील फरकडे यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला अन् निवडणूक बिनविरोध झाली. फरकडे यांची उपसभापतिपदी वर्णी लागली. बाजार समितीच्या इतिहासात कोठारी गावाला नेतृत्वाची संधी मिळाल्याने परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

APMC Chandrapur.
Chandrapur Congress : शंतनू धोटेंच्या उमेदवारी अर्जाचा अर्थ नेमका काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com