Nilesh Ghaywal Case : 'लाडका गुंड' योजनाही सुरू करा...', सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून काँग्रेसचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Gun License Controversy : पुणे येथील गुंड निलेश घायवळच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना दिल्याचं उघडकीस आले आहे. गंभीर गुन्हे दाखल असताना घायवळला पासपोर्ट मिळवतो, तो देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे अशी थेट विचारणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 09 Oct : पुणे येथील गुंड निलेश घायवळच्या भावाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्र परवाना दिल्याचं उघडकीस आले आहे. गंभीर गुन्हे दाखल असताना घायवळला पासपोर्ट मिळवतो, तो देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे अशी थेट विचारणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केली.

यासोबतच आता लाडका गुंड ही योजनाही सुरू करावी असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. राज्यात गुंडांना पासपोर्ट, शस्त्र परवाना मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. गुंडांना पोसण्यासाठी महायुती सरकारने आता लाडका गुंड योजना आणावी या अंतर्गत शस्त्र परवाने द्यायला विशेष काउंटरची व्यवस्था करावी अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

गुंडांना शस्त्र परवाने वेळेत मिळावे म्हणून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना शस्त्र परवाने वाटपाचे काम देऊन टाकावे म्हणजे या गुंडांचा वापर निवडणुकीतही करता येईल अशी टीका वडेट्टीवारांनी केली. विशेष म्हणजे रामदास कदम आणि अनिल परब या दोन शिवसैनिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. जाहीरपणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Vijay Wadettiwar
Pune ZP Election : पुणे जिल्ह्यातील इच्छुकांसाठी मोठी बातमी! ZP व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

एकमेकांच्या कुटुंबांना या वादात ओढले जात आहे. परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डांस बार असल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला बार आमच्या नावावरच नाही असा दावा कदम यांच्यावतीने करण्यात आला होता. आता तो डांस बार नसून ऑर्केस्ट्रा बार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता गुंड घायवळ याच्या भावाला गृहमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला असल्याचे समोर आले आहे.

Vijay Wadettiwar
Anil Parab: योगेश कदमांविरोधात अनिल परब पुन्हा मैदानात : घायवळ प्रकरणात थेट PM मोदींचं नाव घेत फडणवीसांनाही पकडलं कोंडीत

त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरोप करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. या शस्त्र परवान्यामुळे योगेश कदम अडचणीत येण्याची शक्यता आहे. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली तेव्हापासूनच परब यांचे त्याच्याशी खटके उडत आहेत. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात परब यांच्यावर ईडीने धाड टाकली होती. त्यांचे फर्महाऊस बेकायदेशीर असल्याचे दाखवण्यात आले होते. यामागे कदम यांचा हात असल्याचा संशय परबांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com