High Court DJ: विद्यानंद बापटांचा मोठा विजय? सण-उत्सवातील ध्वनी प्रदुषणाची मुंबई हायकोर्टानं स्वत:हून घेतली दखल, उद्या महत्त्वाचा निर्णय ?

Pune DJ Controversy: पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील डीजे, लेझर शो आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात कायदेशीर मोहीम सुरू केली होती. यादरम्यान 3 सप्टेंबर 2026 रोजी त्यांच्यावर जाहीरपणे हल्ला देखील झाला होता.
Vidyanand Bapat DJ Ban .jpg
Vidyanand Bapat DJ Ban .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयानं सण-उत्सवांमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. राज्य सरकारला हायकोर्टानं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. सण-उत्सवातील ध्वनी प्रदूषणाची हायकोर्टानं स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. तसेच या दाखल याचिकेवर मंगळवारी (ता.22) हायकोर्टात तातडीनं सुनावणी होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदुषणाबाबत कोर्ट उद्या मोठा आदेश काढणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा प्रखरतेनं समोर आणत गणेशोत्सवाच्या काळात लाऊड स्पीकर,डीजे यांच्यावर बंदी घालण्याची मागणी उचलून धरली होती.हायकोर्टानं स्वत:हून ध्वनी प्रदुषणाची घेतलेली दखल हा एकप्रकारे बापटांचा मोठा विजय मानला जात आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी तापवला आहे. त्यांना विविध सामाजिक संघटना, संस्थांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. तर हिंदुत्त्ववादी डीजे संदर्भातील संघटनांकडून बापटांच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. याच विरोधातून त्यांच्यावर पुण्यात हल्लाही झाला होता.याच हल्ल्याचा आणि नियमांच्या उल्लंघनाचा संदर्भ देत,न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सण-उत्सवांमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालय या गंभीर विषयावर आता तातडीनं सुनावणी घेणार आहे. 2016 च्या हायकोर्टाच्या आदेशांचे आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन करून सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर डीजे,लाऊडस्पीकर आणि हाय-डेसिबल ध्वनी यंत्रणा वापरली जात असल्याचा आक्षेप संबंधित याचिकेत नोंदवण्यात आला आहे.

Vidyanand Bapat DJ Ban .jpg
BJP News : फडणवीसांच्या खाजगी सचिवांनी आमदार पत्नीचा विरोधकच संपवला; भाजप प्रवेशानंतर माजी आमदार लगेचच राजकीय निवृत्ती घेणार?

वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील डीजे, लेझर शो आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात कायदेशीर मोहीम सुरू केली होती. यादरम्यान 3 सप्टेंबर 2026 रोजी त्यांच्यावर जाहीरपणे हल्ला देखील झाला होता.

Vidyanand Bapat DJ Ban .jpg
BJP News: कॅबिनेट मंत्री अन् भाजप नेत्याचं स्वपक्षीय महिला नगरसेविकेविषयी भरकार्यक्रमातच वादग्रस्त विधान; व्हिडीओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com