Buldhana, 25 August : विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील शेवटची बैठक आज बुलडाण्यात आयोजित करण्यात आली होती. मात्र, बुलडाण्यातील बैठकीसाठी जिल्हाभरातून मनसैनिक मोठ्या प्रमाणात आले होते, त्यामुळे नियोजनाअभावी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
तसेच एका कार्यकर्त्याने समोरच गोंधळ घातला, त्यामुळे राज ठाकरे चांगलेच संतापले. शेवटी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे हे बैठक अर्धवट सोडून निघून गेले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे वीस ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी गोंदियापासून आपल्या विदर्भाच्या दौऱ्याला सुरुवात केली होती.
त्यानंतर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोल्यानंतर ते आज बुलडाण्यातील शेगाव येथे हेाते. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ठिकाणी संघटनात्मक कामांचा आढावा घेताना विधानसभेच्या दृष्टीकोनातूनही चाचपणी केली.
राज ठाकरे यांनी विदर्भातील (Vidharbh) काही मतदारसंघातील उमेदवारही जाहीर केले होते. त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही विदर्भातून मिळाला आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांमध्ये (MNS) उत्साहाचे वातावरण आहे. विदर्भ दौऱ्यातील शेवटची बैठक आज शेगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
बुलडाणा जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शेगाव येथे आयोजित केली होती. त्या बैठकीला जिल्ह्यातून कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आले होते.
त्या तुलनेत नियोजनाची तयारी नव्हती, त्यामुळे बैठकीत काहीसे गोंधळाचे वातावरण होते. त्यातच एका कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले, त्यामुळे राज ठाकरेंसमोरच बैठकीत गोंधळ झाला.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्य मोठी होती. त्यामुळे चोख नियोजनअभावी गोंधळाची परिस्थिती बैठकीत निर्माण झाली होती. बैठकीतील गोंधळाची परिस्थिती पाहून राज ठाकरे हे चांगलेच संतापले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे हे बुलाडाण्यातील बैठक अर्धवट सोडून शासकीय विश्राम गृहावर परतले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.