
Nagpur News : राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील सहभागावरून काँग्रेसमध्ये मोठे मतभेद उफाळून आले असल्याचे दिसून येते. भाई जगताप यांनी मनसेला आघाडीत घेण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे जाहीर केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर मात्र रोखठोक मत व्यक्त केले.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी असा कुठलाच प्रस्ताव दिला नाही. ते सुद्धा कुठे काही याबाबत बोलले नाहीत. मग आम्हीच का बोलायचे? नुसत्याच चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सर्वांचे मनोरंजन होत आहे. स्थानिक निवडणुकीचे विषय आणि मुद्दे वेगळे असतात. बिहार निवडणुकीचा येथे काही परिणाम होत नसतो असे सांगून वडेट्टीवारांनी मनसेला टोकाचा विरोध राहाणार नाही, असेही संकेत दिले.
उद्धव आणि राज ठाकरे बंधूच्या एकीकरणाची चर्चा सातत्याने होत आहे. दोन भाऊ केव्हा आणि किती वेळा एकमेकांना भेटले याचीही चर्चा रंगली आहे. यावरून मुंबई महापालिकेत ते एकत्र लढतील असा कयास बांधला जात आहे. याचा फटका कोणाला बसेल याचेही समीकरण मांडले जात आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिकांना आघाडीचे अधिकार दिले असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसे आघाडीत येणार का आणि आली तरी आघाडी एकत्र लढणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या सर्व घडामोडीवर विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, अजून काहीच ठरलेले नाही. कोणी कोणाला प्रस्तावसुद्धा दिला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे विषय वेगळेच असतात. देशातील राजकारणाचा आणि इतर राज्यातील निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महापालिका किंवा झेडीपच्या निवडणुकीवर होत नसतो.
एकाद्या नव्या पक्षाला आघाडीत घ्यायचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्यात आम्हाला पडण्याची गरज नाही. वरिष्ठ जो सिग्नल देतील तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे. निव्वळ चर्चा झोडून काही उपयोग नाही. आचारसंहिता घोषित होऊ द्या. ग्रामीण भागात आमची काही जिल्ह्यांमध्ये आघाडी होताना दिसत आहे. अकोला नगर पालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार आहे. राज ठाकरे यांच्या काही विधान करणे हे जर तरचे होईल. काहीच ठरलेच नाही तर चर्चा कशाला करायची, टाइमपास करण्यात अर्थ नाही, असेही वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.