Eknath Shinde trouble : महायुतीमध्ये मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, भूमिकेकडे सर्वांचे लक्ष ?

Maharashtra political News : मुंबई महापालिकेत महायुती एकत्रित लढणार आहे तर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यातच आता राज्यात वेगवान घडामोडी घडत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राज-उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा देखील फॉर्म्युला ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनीच या प्लॅनिंगची माहिती दिली. त्यानुसार मुंबई महापालिकेत महायुती एकत्रित लढणार आहे तर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाण्यात महायुतीबाबतचे सर्व अधिकार शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Eknath Shinde
BJP Politics : भाजपचे आमदार जीवाच्या आकांताने पक्षात हवा भरतायत... शिंदे-अजितदादा हळूच टाचणी लावतायत

येत्या काळात होत असलेली निवडणूक विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची आहे. राज्यातील सर्वच पक्ष गेल्या सहा महिन्यापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून काम करीत असल्याने काळ बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विरोधक आणि सत्ताधारी मंडळी एकमेकांना टार्गेट करीत असल्याने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले असून या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Eknath Shinde
BJP Pune: वात पेटली! भाजप नेत्यानं पोलीस ठाण्यातच तालुकाध्यक्षांच्या विरोधात फोडले फटाके!

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबई महापालिकेची निवडणुक तीन पक्ष मिळून लढणार आहेत, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना देण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Sharad Pawar NCP : शरद पवारांचा झुंजार नेता हरपला! माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

ठाण्यात महायुती झाल्यास जागा वाटपावेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महायुतीबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Shivsena Politic's : नगराध्यक्षपदावर शिवसेनेच्याच अनेकांचा डोळा, मंत्री उदय सामंत यांच्या भावाची लागणार कसोटी

'या' कारणामुळे झाली शिंदेंची कोंडी

ठाण्यात महायुतीची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे नेमका काय निर्णय घेणार? ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात येत आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबात उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत, महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, या घडामोडी महत्त्वाच्या ठरत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Congress Protest : महायुती सरकारचा धिक्कार करणार ; कॉंग्रेस नेते खाणार शेतकऱ्यांसोबत 'पिठलं भाकरी' अन् ठेचा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com