Ramdas Athawale Upset : महायुतीत रिपाईची घुसमट? आम्हाला भाजपच्या कोट्यात ढकललं; रामदास आठवलेंची उघड नाराजी

RPI feeling sidelined in Mahayuti: ‘शिवशक्ती-भीमशक्ती’चा नारा फिका? महायुतीत रिपाईला सन्मान नसल्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
Ramdas Athawale upset with Mahayuti
Ramdas Athawale upset with MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti politics Maharashtra : महायुतीतील मित्रपक्षांकडून रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (रिपाई)ला दुय्यम वागणूक मिळत असल्याची उघड नाराजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात रिपाईला सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र आता एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी झाल्यानंतर रिपाईचे राजकीय वजन कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर स्पष्ट भाष्य केले. भाजप आणि शिवसेनेची युती असताना रिपाई महायुतीत सहभागी झाली. त्या काळात ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ची घोषणा दिली जात होती. मात्र आता महायुतीचा विस्तार झाला आणि रिपाईला सत्तेत अपेक्षित स्थान मिळेनासे झाले, असे ते म्हणाले.

रिपाईला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी करताना आठवले यांनी सरकारमध्ये रिपाईचा किमान एक मंत्री असायला हवा होता, असेही स्पष्टपणे सांगितले. विधान परिषद (MLC Election) महामंडळे आणि विविध सत्ताकेंद्रांमध्ये रिपाईला संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Ramdas Athawale upset with Mahayuti
Vivek Kolhe Vs Radhakrishna Vikhe Patil: ‘घायल होता हूं, तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखेंना थेट इशारा? अमित शाह-फडणवीस ‘हॉटलाइन’चाही दावा

या वेळी आठवले यांनी आत्मपरीक्षणाची भूमिकाही घेतली. राजकीयदृष्ट्या आमचा पक्ष अजून अपेक्षित ताकदीने उभा राहू शकलेला नाही. त्यासाठी पन्नास टक्के जबाबदार आम्ही स्वतः आहोत, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे आणि संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Ramdas Athawale upset with Mahayuti
BJP Mumbai politics : विधान परिषदेसाठी वसई-विरारमध्ये ‘हायव्होल्टेज’ हालचाली! सवरा-पाटील भेटीमागे नेमकं काय शिजतंय?

महायुतीतील मित्रपक्षांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करताना आठवले म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने रिपाईला भाजपच्या कोट्यात ढकलून दिले आहे. त्यामुळे आता भाजपनेच आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळांमध्ये संधी द्यायला हवी. महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांतील जागावाटप आणि सत्तेतील प्रतिनिधित्वाचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com