Nagpur Winter Session 2023 : काहीही करा, मेंढीगिरी समितीनुसारच पाणी सोडणार!

Devendra Fadnavis : गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Assembly session 2023 : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याबाबत मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार पाणी सोडण्यात आले आहे. राज्य सरकार त्यावर ठाम आहे. त्यात काहीही बदल होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केली. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse), सुरेश धस ) (Suresh Dhas) यांसह अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

Devendra Fadnavis
Nagpur Winter Session : विदर्भातील अधिवेशनात कापूस प्रश्‍नाला बगल

समन्यायी पाणीवाटप निर्णयानुसार गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व भागातील जायकवाडी प्रकल्पासाठी 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी खोरे विकास महामंडळाने 30 ऑक्टोबरला घेतला. गंगापूर समूहातून 0.5, दारणा समूहातून 2.6, मुळा प्रकल्पातून 2.10 आणि प्रवरा प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पण, नगर आणि नाशिकच्या काही लोकांनी नेहेमीप्रमाणे त्याला विरोध केला. राजाभाऊ तुंगार हे उच्च न्यायालयात तर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात कोणताही स्थगिती दिली नाही, असे दानवे म्हणाले.

हेतूपुरस्सर विलंबाचा आरोप

समन्यायी पाणीवाटप सूत्रानुसार दरवर्षी हे पाणी सोडण्याचे आपले धोरण आहे. त्याची तारीख देखील निश्चित आहे. तरीही दरवर्षी काही लोक विरोध करतात. जलसंपदा विभागाचे काही अधिकारी त्यात टाळाटाळ करतात. वेळ निघून गेल्यावर बाष्पीभवन होते. पाणी सोडण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्यांची आहे. ते दरवर्षी हेतूपुरस्सर विलंब करतात आणि पाण्यावरून संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सरकार हे टाळणार आहे की नाही, असा दानवे यांनी सरकारला विचारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय

जे काही न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडायचे आहे ते सोडले गेलेच पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्यानुसारच आपण निर्णय घेतला होता. मात्र, यंदा त्यात काही विलंब झाला. पोलिस यंत्रणा अन्यत्र व्यस्त असल्याने तसे झाले. पाणी उशीरा गेले तरी चालणार होते. कधी कधी स्थानिक परिस्थितीनुसार मागे पुढे होते. मात्र न्यायालयात सरकार मेंढीगिरी समितीनुसार पाणी सोडण्यावर ठाम राहिले. यापुढेही तसेच होईल, असे स्पष्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(Edited By Roshan More)

Devendra Fadnavis
Rajiv Gandhi : ...त्यामुळे राजीव गांधी सरकारने देखील 63 खासदारांचे केले होते निलंबन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com