Salil Deshmukh Vs Parinay Fuke : परिणय फुकेंवर सलील देशमुख संतापले; ‘आता भाजप नेत्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी’

Devendra Fadnavis-Anil Deshmukh News : राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन ड्राईव्हवरून चांगलाच वाद रंगला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चार नेत्यांना फसविण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता.
Salil Deshmukh Vs Parinay Fuke
Salil Deshmukh Vs Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 26 July : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून त्यांना परत तुरुंगात पाठवण्याची मागणी करणारे आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख चांगलेच संतापले आहेत.

भाजपला सत्तेचा माज आला आहे. त्यांचे दिवस भरले असून भाजपच्या अनेक नेत्यांनी तुरुंगात मुक्कमाला जाण्याची तयारी करावी, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये पेन ड्राईव्हवरून चांगलाच वाद रंगला आहे. देशमुखांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आपल्यावर फडणवीसांनी दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चार नेत्यांना फसविण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र भरून देण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत काय बोलले, याचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून तो उघड करण्याचा इशारा दिला होता. त्यास देशमुखांनी तुमच्याकडे असलेला पेनड्राईव्ह जगजाहीर करावा, असे सांगून त्यांना आव्हान दिले होते.

Salil Deshmukh Vs Parinay Fuke
Abdul Sattar : पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; ‘नव्वद दिवसांत...’

या वादात फडणवीसांचे विश्वासू आमदार परिणय फुके यांनी उडी घेतली. त्यांनी देशमुख हे वैद्यकीय रजेवर जामीनावर असल्याचे सांगून न्यायालयाच्या निर्णयावर अविश्वास व्यक्त केल्याने त्यांना परत तुरुंगात पाठवण्याची मागणी केली. त्याला आता सलील देशमुख यांनी उत्तर दिले आहे.

Salil Deshmukh Vs Parinay Fuke
Prakash Ambedkar : संभाजीराजेंच्या वैचारिकतेशी आमचं जुळत नाही; आंबेडकरांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न फसला

तुमच्याकडे असलेला पेन ड्राईव्ह सार्वजनिक करा, सर्व आरोपांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचे राज्य संपुष्टात येणार आहे, त्यामुळे भाजपच्याच नेत्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com