
थोडक्यात बातमी:
महायुती सरकारनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ८ महिने उलटूनही निर्णय प्रलंबित आहे.
मंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळात कर्जमाफीवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घोषणा करतील असे संकेत दिले.
शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी तीव्र होत असून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने दबाव टाकला जात आहे.
Yavatmal News : महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.पण महायुतीचं सरकार येऊन आता आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र,अद्याप कर्जमाफी (Loan Waiver Farmers) करण्याबाबत सरकारनं कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही.त्याचमुळे विरोधकांकडून सातत्यानं सरकारवर धारेवर धरले जाते. याचदरम्यान,काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीविषयीचे संकेत दिले होते. आता एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनं आता मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. After Chandrashekhar Bawankule, Minister Sanjay Rathod confirmed that Maharashtra CM Devendra Fadnavis will soon announce a major farmer loan waiver. Get the latest updates on MahaYuti government’s decision
एकीकडे राज्यातील शेतकरी वर्गाचं सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेकडे लक्ष लागलेले असताना मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोठं विधान केलं आहे.कर्जमाफीसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असल्याची मोठी अपडेट दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतीदिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.याच कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आहे.
मंत्री संजय राठोड म्हणाले,संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे.राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल,असे संकेत राठोड यांनी या कार्यक्रमात दिले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री उपस्थित राहू शकले नाही याबद्दलही राठोड यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी हा कृषिसन्मान हा पुरस्कार नसून नव्या पिढीसाठी ठेवा असल्याचंही नमूद केलं होतं.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी होणार नाही. फक्त गरजूंसाठी होईल, असं म्हणाले आहेत. तसेच फार्महाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यामुळे सरकार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढला जात आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी महायुती सरकारला घेरताना कर्जमाफी कधी करणार? असा जाब विचारला होता. त्याला उत्तर सरकारनं कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सभागृहात दिली होती. या समितीचा कर्जमाफीबाबतचा अहवाल आल्यानंतर सरकार कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेईल,असंही सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.
प्रश्न 1: महायुती सरकारनं शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं?
👉 शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.
प्रश्न 2: मंत्री संजय राठोड यांनी काय विधान केलं?
👉 कर्जमाफीवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून लवकरच घोषणा होईल, असे ते म्हणाले.
प्रश्न 3: विरोधक सरकारवर का टीका करत आहेत?
👉 कारण आठ महिने झाले तरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही.
प्रश्न 4: कर्जमाफीसाठी सरकारनं काय पावले उचलली आहेत?
👉 कर्जमाफीबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.