Amravati Tehsildar : मोठी बातमी! तहसीलदार निलंबनानंतर प्रशासकीय बदल, आता संतोष आठरेंची नियुक्ती!

Santosh Athare Vijay Lokhande Suspension : संजय गव्हाळे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तहसीलदार विजय लोखंडे यांना निलंबित करण्यात आले होते.
Amravati Tehsil (AI-Generated Image)
Amravati Tehsil (AI-Generated Image)sarkarnama
Published on: 
Updated on: 

Tehsildar News : महापालिकेने रद्द केलेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी दिल्याच्या प्रकरणात अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. २२ मे २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या जागी संतोष आठरे यांची अमरावतीच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी २३ जून २०२३ रोजी वडद परिसरातील दोन लेआउटची मंजुरी रद्द केली होती. मात्र, ही मंजुरी रद्द झाल्यानंतरही संबंधित लेआउटला पुन्हा परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच १५ मार्च २०२४ रोजी या दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे नव्याने अर्ज करण्यात आला.

विशेष म्हणजे, अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत, १९ मार्च २०२४ रोजी या दोन्ही लेआउटला पुन्हा मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेत तहसीलदार विजय लोखंडे यांनी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे घाईघाईने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आधी रद्द झालेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी देताना नियम आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले होते का, असा प्रश्न उपस्थित झाला.

या प्रकरणी गोपालनगर येथील रहिवासी संजय गव्हाळे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती. महापालिकेने रद्द केलेल्या लेआउटला पुन्हा मंजुरी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन केले का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच नगररचना विभागातील अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने घाईघाईत मंजुरी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.

Amravati Tehsil (AI-Generated Image)
BJP challenges Congress : निलंग्यात पुन्हा भाऊबंदकी आमने-सामने; लातूर डीसीसी बँकेसाठी काकीविरुद्ध पुतण्या लढत रंगणार!

या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे लेआउट मंजुरी प्रक्रियेत सहभागी असलेल्या महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची भूमिकाही चर्चेत आली आहे.

दरम्यान, संतोष आठरे यांनी अमरावती तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. या प्रकरणाच्या पुढील चौकशीत आणखी कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Amravati Tehsil (AI-Generated Image)
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार होतं, तारीखही ठरली होती, आता..! सुनील तटकरेंचं पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.