Nagpur News, 12 Nov : भारतीय जनता पक्ष फारसा प्रतिसाद देत नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेने ज्या नगर परिषदेत पक्षाची ताकद जास्त आहे. त्या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागी राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षासोबत युती केली जाईल असेही ठरवण्यात आले आहे.
यासोबतच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन शिवसेनेने आम्ही आमची तयारी करीत असल्याचा संदेश भाजपला दिला आहे. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी ही माहिती दिली. नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषदा आणि १२ नगर पंचायतीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आपसात बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. मात्र भाजपने प्रस्ताव स्वीकारला नाही आणि सन्मानजनक जागा दिल्या नाही तर युतीमध्ये आणखी काही संघटना व पक्षांना सोबत घेण्याचा विचार केला जात आहे.
या दरम्यान, कृपाल तुमाने यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांची मते जाणून घेतली. या चर्चे दरम्यान जिल्ह्यातील काही नगर परिषदांमध्ये शिवसेनेची मजबूत ताकद असल्याने, पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी शिवसैनिक सज्ज राहावे असे सांगण्यात आले. मुलाखती दरम्यान उमेदवारांशी निवडणुकीची रणनीती, स्थानिक समस्या आणि पक्षाची तयारी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
शिवसेनेने आपल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेशही भाजपला दिला. आमदार कृपाल तुमाने म्हणाले, शिवसेनेला महायुतीमध्येच लढण्याचे आहे. सोबतच शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही याकडेसुद्धा लक्ष द्यावे लागले.
पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी काही महत्त्वाच्या जागा लढणे आवश्यक आहे. काही नगर पालिकांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आम्ही या जागांवर सर्वाधिक फोकस करणार आहोत. राष्ट्रवादीशी युती करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासोबत प्राथमिक बोलणी झाली आहे. भाजपने अद्याप काही कळवले नाही.
ते वेगळे लढणार असतील तर हरकत नाही. आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, युवासेना पूर्व विदर्भ संघटक शुभम नवले आणि महिला सेना जिल्हाप्रमुख नेहा भोकरे यांच्यासह विविध नगर परिषदेतील स्थानिक मुख्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.