Shivsena News: विजयी मेळाव्यानंतरही शिवसेनेच्या नेत्याला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शंका; म्हणाले...

Raj And Uddhav Thackeray Unity : हिंदी भाषेच्या सक्तीच्याविरोधात उद्धव आणि राज ठाकरे दोन दशकानंतर एकत्र आले आहेत. सोबत राहण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असा संदेश विजय सभेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मात्र दोन भावांच्या एकत्रीकरणावर शंका व्यक्त करण्यात आली आहे.
Uddhav And Raj Thackeray reunion
Uddhav And Raj Thackeray reunionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे दोन दशकानंतर एकत्र आले आहेत. सोबत राहण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असा संदेश विजय सभेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मात्र दोन भावांच्या एकत्रिकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) शंका व्यक्त केली आहे.

मराठीचा विषय वेगळा आणि निवडणुकीचा वेगळा असतो असे सांगून त्यांनी आपल्यास असे काही होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले राज ठाकरेच नव्हे तर अनेक दिग्गज नेते सेनासोडून गेले. त्यावेळी त्यांना थांबवले का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांची मने दुखावली आहेत. त्यामुळे अनेकाजण सोडून गेले. राज ठाकरे यांना ते एकही जागा द्यायला तयार नव्हते. त्यामुळे यापूर्वी मनसे आणि उद्धव सेनेचे मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत युती होऊ शकली नव्हती. राज यांचे शिवसेनेतून बाहेर पडणे आणि मनसेचे स्थापना करण्यास उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे ते एकत्र येतील याची मला शंका आहे.

मुळात दोन्ही ठाकरे यांना एकत्र येण्याची गरज का पडली हा मोठा प्रश्न आहे. आप्त स्वकीयांना, निष्ठवंतांना दूर केल्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर उद्‍भवली आहे. मागील पंचवीस, तीस वर्षाचा इतिहास तपासला असता शेकडो नेते शिवसेनतून बाहेर पडले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, नारायण राणे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असता तर दुसरा कुठलही राजकीय सेना अस्तित्वात आली नसती.

Uddhav And Raj Thackeray reunion
Mahayuti Government: महायुती सरकार लाडक्या बहिणीनंतर पुढचा धक्का बळीराजाला देणार? 'त्या' शेतकऱ्यांना 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकणार

उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण गमवावा लागला नसता, असा टोलाही आशिष जयस्वाल यांनी लगावला. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नारायण राणे, गणेश नाईक हे वेगळे का झाले याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे. ते दूर जात असताना त्यांना थांबवण्यात का आले नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना कोणीच हवे नव्हते का, आता राज ठाकरे यांची गरज का भासायला लागली, ही परिस्थिती का उद्‍भवली याचाही विचार करण्याची गरज असल्याचे आशिष जयस्वाल म्हणाले.

Uddhav And Raj Thackeray reunion
Maharashtra on top : खासदार दुबे, बघा महाराष्ट्र किती टॅक्स भरतोय? UP, MP, बिहार एक झाले तरी सोसणार नाही...

आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचा धनुष्यबाण कायम ठेवला आहे. एकनाथ शिंदे सोबत ते गेल्यानंतरही पुन्हा निवडून आले आहे. सध्या ते राज्यमंत्री आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com