Lok Sabha Election 2024 : बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Buldhana Constituency : उमेदवाराच्या नावाची घोषणा शक्य; शिंदे गटावर साधणार निशाणा
Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.Sarkarnama
Published on
Updated on

फहीम देशमुख

Lok Sabha Election 2024 : बुलडाणा जिल्ह्यातले दोन आमदार आणि एक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर तसेच खासदार प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेंसोबत असलेले काही आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असून, ते लवकरच शिंदे गटाकडे येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या सर्व विषयांना उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठकरे 22 व 23 फेब्रुवारी असे दोन दिवस बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. बंडखोरांच्या ‘होमटाऊन’मध्ये ते प्रत्येक आरोपांचे उत्तर कसे देणार? याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 फेब्रुवारीला चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे सभा घोणार आहेत. दुसऱ्या दिवशी 22 फेब्रुवारीला मेहकर आणि सिंदखेडराजा येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. 21 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने आगमन होऊन ते सकाळी 10 वाजता चिखलीत सभा घेतील. दुपारी तीन वाजता ठाकरे यांची मोताळा येथे मलकापूर रोडवरील बुलडाणा अर्बनजवळ जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता ते जळगाव जामोद येथे श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात सभेला संबोधित करतील. शेगाव येथे ते मुक्कामी राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Buldhana Sanjay Kute Politics : खासदारांसमोर घडलेल्या मानापमान नाट्यानंतर भडकले आमदार कुटे !

गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन ते खामगावकडे रवाना होतील. येथे हॉटेल तुळजाई येथे कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करतील. दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करणारे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या ‘होमटाउन’ मेहकरमधील स्वातंत्र्य मैदानावर जाहीर सभा होईल. सायंकाळी पाच वाजता ते राष्ट्रमाता जिजाऊ राजवाड्याजवळील जाहीर सभेत बोलतील. या वेळी त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविद सावंत, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, मेंहकर शिवसेना प्रमुख किशोर गारोळे हे उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. 23 तारखेला ठाकरेंच्या खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकरातील सभेकडे जिल्हावासीयांच्या नजरा खिळल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांना पराभूत करण्यासाठी ठाकरे हे सावधपणे पावले उचलत आहेत. त्यामुळेच ते लोकसभेसाठीची आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. प्रतापरावांना धूळ चारण्यासाठी प्रा. नरेंद्र खेडेकर यशस्वी होतील की नाही, याबाबत खुद्द ठाकरे हे साशंक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Buldhana News: दोन गटात हाणामारी; 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष जखमी...

बुलडाण्याच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीनेदेखील दावा केला असला तरी प्रकाश आंबेडकर हेही जागा ठाकरे यांनाच सोडणार असल्याचेही जवळपास ठरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुलडाणा व हिंगोलीच्या दौर्‍यावर येत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतून बंडखोरी झाली आहे. बुलडाणा जिल्हा दौरा करताना ते जिल्ह्यात एकूण सहा सभा घेणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांच्या चार सभा होणार आहेत. 22 फेब्रुवारीला चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद यात्रेनंतर ठाकरे यांच्या घणाघाती सभा होतील. 24 फेब्रुवारीला उमरेड आणि वसमत या दोन ठिकाणी त्यांच्या सभा आहेत.

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Lok Sabha Election 2024 : बुलढाणा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजपकडून चढाओढ

बुलडाणा व हिंगोली मतदारसंघांतील उमेदवारीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत अद्याप ‘सस्पेन्स’ कायम आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत बुलडाण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यांना विविध राजकीय पक्षांच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात फारसे अनुकूल मत नसल्याने व त्यांच्यासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे आव्हान राहणार असल्याने खेडेकर यांच्या उमेदवारीची घोषणा ठाकरे यांनी टाळली होती. आता बुलडाणा दौर्‍यावर आल्यानंतर ते खेडेकर यांच्या नावाची घोषणा करतील की आणखी कुणाचे नाव जाहीर करतील, याकडे शिवसैनिकांसह जनतेचे लक्ष लागून आहे.

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Ambadas Danve : बुलढाणा मतदारसंघावरून ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये रस्सीखेच ; अंबादास दानवे म्हणाले...

बुलडाण्यासाठी पदाधिकार्‍यांपैकी काहींनी उमेदवारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे नाव सुचविले होते. नंतर काहींनी खासगीत विरोधही केला होता. तथापि, महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्की असे समजून खेडेकर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मात्र, दुसर्‍याच दिवशी एका पदाधिकार्‍याने माध्यमांशी बोलताना, उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे सांगून जल्लोषातील हवा काढून घेतली होती. प्रा. खेडेकर यांच्या विजयाबाबत उद्धव ठाकरे हे साशंक आहेत. त्यांच्या डोक्यात वेगळाच उमेदवार असून, तो शेतकरी नेते रविकांत तुपकरही असू शकतात, असे शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Buldhana Politics : बुलढाणा तापलं; एकाच गावात राहणाऱ्या तुपकर अन् आमदार गायकवाडांमध्ये जुंपली

‘वंचित’चाही दावा!

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेदेखील या मतदारसंघावर दावा केलेला आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत महाविकास आघाडीला ‘वंचित’चा फटका बसला होता. बुलडाण्यात ‘वंचित’ला 42 हजार, तर सिंदखेडराजात 40 हजार, जळगावमध्ये 30 हजार, तर खामगावात 26 हजार मते मिळालेली आहेत. प्रकाश आंबेडकर हे बुलडाण्याची जागा उद्धव ठाकरे यांना सोडण्यास अनुकूल असल्याची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Uddhav Thackeray & Prataprao Jadhav.
Nagpur Winter Session : बुलढाणा रुग्णालयातील घोटाळ्याची नव्यानं चौकशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com