Mahayuti Government: शिवसेनेच्या मंत्र्यानं थेट मोदींचाच आदेश धुडकावला? विमान,हेलिकॉप्टर प्रवास अन् ताफ्यातील गाड्यांचा आकडा समोर

Shivsena News: पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर काटकसर आणि बचत करण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी,इंधन बचत, सोने खरेदी टाळा,वर्क फ्रॉम होम करण्यासह अनावश्यक प्रवास टाळा, असं म्हटलं होतं. याचसह परदेश दौरे 'व्होकल फॉर लोकल'चा अवलंब करावा असेही आवाहन केले होते.
Sanjay Rathod News .jpg
Sanjay Rathod News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha News: अमेरिका-इराण-इस्त्रायल या देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईचं नवं संकट ओढावलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं इंधन बचतीच्या आदेशालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या एका मंत्र्याकडून डावलल्याचं आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद समोर आलं होतं. यानंतर राजकीय नेतेमंडळींनी आपल्या कृतीतून म्हणजे गाड्यांचा ताफा बाजूला सारुन दुचाकी,वंदे भारत ट्रेन किंवा ईव्ही कारनं कमीत कमी ताफा सोबत घेत प्रवास केल्याचं दिसलं होतं. तर दुसरीकडे आता शिवसेनेची मंत्री संजय राठोड यांनी 20 गाड्या,हेलिकॉप्टरसह प्रवास केल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांनी शनिवारी(ता. 30)वाशिम जिल्ह्यातील दौऱ्यात मुंबई ते नागपूर विमान,तर नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टर,तसेच सरकारी 20 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा होता. त्यात 12 ते 15 खासगी वाहनांचा समावेश होता टीकेचा सूर आळवला जात आहे. त्यांनी पोहरादेवी येथील वास्तू संग्रहालयाची पाहणी करताना हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मुंबईहून विमानाने नागपूरला गेले होते.तेथून त्यांनी हेलिकॉप्टरनं पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी माजी खासदार विजय दर्डाही त्यांच्याबरोबर असल्याची माहिती आहे.

Sanjay Rathod News .jpg
Abhishek Banerjee News: पश्चिम बंगालमधून धक्कादायक अपडेट, ममता बॅनर्जींच्या खासदार भाच्यावर हल्ला; अंडी फेकली, कपडे फाडले....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला डावलल्याच्या आरोपाला अखेर मंत्री संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,पोहरादेवीचं संग्रहालय माजी खासदार विजय दर्डा यांना पाहायचं होतं. इतरही अनेक गोष्टींचाही त्यात समावेश होता. त्या वेळेत व जलदगतीनं पूर्ण करणं गरजेचं होतं. म्हणून दर्डा यांच्यासोबत आलो. यावेळी त्यांनी आपण गाड्यांचा ताफा निम्म्यावरचा दावा करतानाच पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची अंमलबजावणी केल्याचंही म्हटलं.

नितेश राणेंचाही व्हिडीओ व्हायरल...

पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर काटकसर आणि बचत करण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी,इंधन बचत, सोने खरेदी टाळा,वर्क फ्रॉम होम करण्यासह अनावश्यक प्रवास टाळा, असं म्हटलं होतं. याचसह परदेश दौरे 'व्होकल फॉर लोकल'चा अवलंब करावा असेही आवाहन केले होते.

Sanjay Rathod News .jpg
BJP strength Ahilyanagar : विधान परिषदेतून तनपुरेंची एंट्री? भाजपचे 7 आमदार, पण ‘मूळ भाजपवासी’ फक्त 2च!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी आपण आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केल्याचा दावा केला होता. तसेच त्यांचा मंत्रालयात पायी जातानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पण यानंतर 24 तासांच्या आतच त्यांचा हा दावा खोटा ठरल्याची चर्चा रंगली होती. राणे यांच्या ताफ्यात तब्बल डझनभर गाड्या धावल्याचं व्हिडीओतून समोर आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com