

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तांतर झाले होते.तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का देत भाजपनं तिथं एकहाती सत्ता खेचून आणली. विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं हिंसाचाराच्या घटना घडताना दिसून येत आहे. भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येनंतर आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांनी सत्ता गमावल्यानंतर प्रथमच भाजपाचं सरकार आलं आहे. पण यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. आता टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी तातडीनं तिथे कारवाई करत बॅनर्जी यांना हॅल्मेट घालून जमावापासून वाचवत बाहेर काढले.
ही घटना पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे घडली. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे निवडणुकीतील हिंसाचारात जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांना तिथे भेटायला गेल्याची माहिती समोर येत आहे.ते तिथे दाखल होताच त्यांना घेरण्यात आलं. यानंतर मोठी घोषणाबाजी करत त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला.
पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे जमावाकडून खासदार अभिषेक बॅनर्जींवर अंडी फेकण्यात आली तसेच त्यांचे कपडेही फाडण्यात आले. यानंतर सुरक्षारक्षकांनी अभिषेक यांना हेल्मेट घालून तिथून बाहेर काढले. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक म्हणाले, हे लोक मला मारू इच्छित होते. माझा शर्ट फाडला. घटनास्थळी एकही पोलिस उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच हेल्मेटमुळेच माझे डोके वाचले. परंतू, अशा हल्ल्यांनी आम्ही घाबरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे एक अत्यंत प्रभावशाली युवा नेते असलेल्या अभिषेक बॅनर्जींवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक बॅनर्जीं हे डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून सलग खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि तृणमूल युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांना धक्का देण्यासाठी व्यूहरचना आखल्याचं समोर आलं होतं. पहिलाच दणका हा ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना देण्यात आला होता. त्यांच्या घराबाहेरील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आल्याचं समोर आलं होतं. आहे
अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेर 4 मे पर्यंत 300 ते 350 पोलीस कर्मचारी तैनात होते. मात्र, यानंतर राज्यातील नव्या भाजप सरकारकडून ही सुरक्षा रक्षक हळूहळू हटवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे घराबाहेर लावण्यात आलेली सुरक्षा यंत्रणाही काढून टाकण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.