शिवसेनेत २५ वर्षात फक्त वेदनाच मिळाल्या ; तीन टर्म आमदार राहिलेल्या बाजोरियांची खंत

Gopikishan Bajoria |कधीही कोणत्या प्रकारचे मंत्रिपद मागितलं नाही, गेल्या २५ वर्षात फक्त वेदना पाहायला मिळाल्या.
Gopikishan Bajoria
Gopikishan Bajoriasarkarnama
Published on: 
Updated on: 

अकोला : तीन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि आमदार विप्लव बाजोरिया हे पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

या संदर्भात बाजोरियांनी आज पत्रकार परिषद घेत मनातील खंत व्यक्त केली. "आपण मागील काळात उध्दव साहेबांना (Uddhav Thcakeray)उपसभापती पद मागितलं. तेव्हा अडीचं वर्षानंतर दिले जाईल, असं आश्वासन दिले, त्यानंतर नाराजीच हाती आली,"अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "संजय राठोड यांच्या राजीनामानंतर विदर्भाला कोणतेही मंत्रीपद शिवसेनेला दिलं नाही, असेही त्यांनी सांगितले.

गोपीकिशन बाजोरिया म्हणाले "जिल्ह्यातील पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला, या पदाधिकाऱ्यांच्या अनेकदा उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. नगरसेवक, तीनदा विधानपरिषद आमदार राहिलो. मात्र ठाकरेंकडून नाराजी राहिली, कधीही कोणत्या प्रकारचे मंत्रिपद मागितलं नाही, गेल्या २५ वर्षात फक्त वेदना पाहायला मिळाल्या,"

Gopikishan Bajoria
Eknath Shinde: मालेगाव जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद

गेल्या अनेक दिवसांपासून बाजोरिया शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. बाजोरिया यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी गुरुवारी (२८ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृहावर हा प्रवेश समारंभ झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com