Eknath Shinde : ब्रेकिंग न्यूजने महायुती 'ब्रेक' होणार नाही; शिंदे यांनी विरोधकांना सुनावले

ShivSena DCM Eknath Shinde opposition propaganda Mahayuti Gondia Vidarbha : महायुतीमध्ये शिवसेना नाराज असल्याच्या बातम्यांवरून एकनाथ शिंदेंची विरोधकांविरुद्ध टोलेबाजी.
Eknath Shinde 2
Eknath Shinde 2Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांना उपमुख्यमंत्री केल्याने ते नाराज आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाहीत. वारंवार गावाला जातात. महायुती सरकारमध्ये वाद आहेत, या विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले.

अशा कितीही ब्रेकिंग न्यूज झळकल्या, तरी महायुती ब्रेक होणार नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टीम म्हणून काम करीत असल्याचे शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शहरात सांगून सर्व आरोपांची हवा काढून टाकली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि काँग्रेस (Congress) विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार सातत्याने महायुतीत वाद आहेत, एकनाथ शिंदे नाराज आहेत, म्हणूनच ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहात नाहीत. त्यांची उपयोगिता संपली आहे, त्यांना धक्के देण्याचे काम सुरू आहेत, असे आरोप करीत आहेत.

Eknath Shinde 2
SSC Exam Paper Leak : दादा भुसे 'अ‍ॅक्शन मोड'वर, पेपर फोडणाऱ्यांवर उगरला कायद्याचा दंडुका; गुन्हा दाखल, शिक्षण विभागात खळबळ

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना शिंदे यांचा पर्याय म्हणून शोधून ठेवण्यात आल्याचेही दावे केले जात आहे. या सर्व आरोपांचा नागपूरच्या दौऱ्यात शिंदे यांनी समाचार घेतला. मी एका बैठकीला गेले नाही तर ब्रेक्रिंग न्यूज केली जाते. उबाठा आणि काँग्रेसचे नेते तुटून पडलात. जे काही घडलच नाही ते सांगतात. महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही बैठक मंत्रालयात घेतली नाही. ते 'मातोश्री'च्या बाहेरच पडले नाहीत, असा टोला लगावला.

Eknath Shinde 2
Kash Patel : तगडी 'FBI' यंत्रणा; नेतृत्व करणार भारतीय-अमेरिकन चेहरा

महायुतीचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण साथ दिली. आता ते मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. डबल इंजीन सरकार म्हणून काम करीत आहोत. विरोधकांना दुसरे काही काम शिल्लक राहिले नाही. त्यांना त्यांचे नेते व कार्यकर्ते सोडून चालले आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. काय चालले ते बघावे, असाही सल्ला शिंदे यांनी विरोधकांना दिला.

महविकास आघाडीच्या कार्यकाळार राज्याचा विकास ठप्प झाला होता. जनता हतबल झाली होती. आम्ही सरकारमध्ये येताच विकासाला चालना देण्याचे काम केले. लाडक्या बहिणींसाठी योजना जाहीर केली. ती त्यांना खटकली. लोकांना आमच्या विरोधात कोर्टात पाठवले. आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र सर्वसामान्यांच्या लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे यासाठी काम केले त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेनी सत्तेवर बसवले.

आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. कार्यकर्तना मोठे करून त्यांना संधी द्यायची आहे. काही पक्ष मालक आणि नोकराचे आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. येथे कोणासाठी वशिला लागत नाही. जो काम करतो तो मोठा होतो. पक्ष वाढवणाऱ्याला पदे दिली जातात. त्यामुळे पक्ष मोठा करा, हेच आपले भांडवल असल्याचे आवाहन शिंदे यांनी शिवसैनिकांसह विविध पक्षातून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com