Hingoli News: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिले जात आहे. दोन्ही गटाकडील आमदारांनी निर्णय आमच्याच बाजूने लागणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिंदे गटातील आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी निकालापूर्वीच वादग्रस्त विधान केलं आहे.
"निकाल आमच्याच बाजूने लागणार,'असे म्हणत निकाल लागल्यावर गुपचूप बसा नाहीतर पोलिस रट्टे देतील, असे विधान केलं आहे. शिवसेना आमच्याकडे आहे, तिकडे (ठाकरे गट) उरलेली सेना आहे. ही सेना सोनिया गांधी आणि राहुल गांधींची शिवसेना आहे. आक्रमक शिवसैनिक आमच्याकडे आहेत. त्यामुळे कुणी काहीही सांगत असेल पण आमचे पोलिस सक्षम आहे. त्यांना रट्टे देऊन शांत करतील, निकाल लागल्यावर गुपचूप गप्प बसा नाही तर रट्टे देऊन ते मोकळे होतील," असे बांगर म्हणाले. "शिवसेनेच्याच बाजूनं निकाल लागणार याच कुठलेच दुमत नाही," असा ठाम विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष आम्हीच करणार असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांकडून कितीही प्रचार करण्यात आला तरी त्यांचा असुरी आनंद आहे , कितीही देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष देखील आम्हीच करणार असा टोला त्यांनी विरोधकाना लगावला.
आजचा निकाल म्हणजे लोकशाहीमध्ये मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. आज शिवसेनेच्या दोनही गटाच्या आमदार अपात्रतेवर निकाल येणार आहे. त्यामुळं कही खुशी कही गम असा हा निकाल असेल. देशाच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल कारण न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली त्यातून अध्यक्ष काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आज अध्यक्षांचीच कसोटी म्हणावी लागेल. त्यामुळे कही खुशी कही गम असा निकाल असेल मात्र निकालाने ज्यांचं समाधान झालं नसेल त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येईल, असे निकम यांनी म्हटलंय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.