Sanjay Gaikwad on Rajendra Shingne : राष्ट्रवादीचा पालकमंत्री नको रे बाबा ! ; शिंदे गटातील आमदाराच्या विधानामुळे नवा वाद

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद मिळू देणार नाही, असे संजय गायकवाड म्हणाले.
Sanjay Gaikwad, Rajendra Shingne :
Sanjay Gaikwad, Rajendra Shingne : Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana : नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलं. "डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आता मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?" असा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला होता, त्याला गायकवाडांनी विरोध केला.

राष्ट्रवादीला पालकमंत्री नको, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतल्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्याने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Sanjay Gaikwad, Rajendra Shingne :
Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना पालकमंत्री मिळेल, अशी चर्चा आहे. याबाबत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी त्यांनी "काही झाले तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही" अशी भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तीन आमदार आहेत, त्यामुळे एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद मिळू देणार नाही, असे संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Gaikwad, Rajendra Shingne :
Sakal-Saam Survey On NCP : अजित पवार गटाचे धाबे दणाणले; काय सांगतो 'सकाळ-साम' सर्व्हे ?

संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावरही आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यावेळी गायकवाडांनी केला होता. त्यामुळे पुन्हा शिंगणे पालकमंत्री झाले तर जिल्ह्यात गायकवाड विरुद्ध शिंगणे असा वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुतीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करुन पालकमंत्री पदाबाबत चर्चा करणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com