Devendra Fadnavis Reply Thackeray : '' ...म्हणून आम्ही उध्दव ठाकरेंचं दुकानच बंद केलं!''; फडणवीसांचा तिखट पलटवार

Maharashtra Politics : '' मै समंदर हूँ, लौटकर जरुर आऊंगा...''
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Akola : मुंबई येथील ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं होतं. यावेळी देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे हो!, तुम्ही बोलताय ठीक आहे, पूर्वी जाहिरात यायची. पण आता सहनही होत नाही, सांगता ही येत नाही, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीसांना निशाणा साधला होता. या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकोला येथील कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंच्या टीकेवर जोरदार पलटवार केला.फडणवीस म्हणाले, मी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेवा, मै समंदर हूँ, लौटकर जरुर आऊंगा आणि मी परत आलोच शिवाय येताना सोबत शिंदेंना घेऊन आलो. आणि हे अजूनही भाषणंच ठोकताहेत.यांच्या पक्षातून रोज लोक निघून जाताहेत. यांच्या नाकाखालून ४०-४० आमदार निघून गेले तरी यांना समजतही नाही.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : ''सहनही होत नाही, सांगताही येत नाही! याचे उत्तम उदाहरण म्हणजे, देवेंद्र फडणवीस''

दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी यांनी ज्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्यादिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करुन टाकेन. पण २०१९ ला उध्दव ठाकरे सत्तेसाठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. आणि याचमुळे आम्ही ठाकरेंचं दुकान बंद केलं असं आणि बाळासाहेबांचा पक्ष पुन्हा एकदा एकनाथ शिंदें(Eknath Shinde)च्या नेतृत्वाखाली उभा केला असं प्रत्युत्तरही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं.

मी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेवा, मै समंदर हूँ, लौटकर जरुर आऊंगा आणि मी परत आलोच शिवाय येताना सोबत शिंदेंना घेऊन आलो. आणि हे अजूनही भाषणंच ठोकताहेत.यांच्या पक्षातून रोज लोक निघून जाताहेत. यांच्या नाकाखालून ४०-४० आमदार निघून गेले तरी यांना समजलंही नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले. मला उध्दव ठाकरेंबाबत म्हणावंसं वाटतं, काय होतास तू, काय झालास तू असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : ही एकजूट विरोधी पक्षांची होणार नसून... उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

फडणवीस पुढे म्हणाले, 2019 लाही मोदींच्या पराभवासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी व्यासपीठावर अनेक पक्षांचे ५२ नेते उपस्थितीत होते. पण काँग्रेसचे अवघे ४८ खासदार निवडून आले. जितके लोक व्यासपीठावर उपस्थित होते तितकेही खासदार त्यांना निवडून आणता आले नाही. आताही विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात आता आणखी एक नाव सहभागी झालं आहे ते म्हणजे उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray). पण कितीही वेली एकत्र आल्या तरी त्याचा वटवृक्ष होऊ शकत नाही असाही हल्लाबोल फडणवीसांनी यावेळी विरोधी पक्षांवर केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.