SRPF News : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील नांदेडच्या जवानाची गोळी झाडत आत्महत्या

Collector's Residence : चंद्रपुरातील घटनेनंतर पोलिस विभागात खळबळ; कारण अस्पष्ट
Gadchiroli Collector Residence
Gadchiroli Collector ResidenceSarkarnama

Gadchiroli : जिल्ह्यात पोलिस जवानांवर असलेल्या तणावातून घडणाऱ्या घटनांमुळै कमालीची वाढ होत आहे. अशाच एका घटनेत जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी तैनात सुरक्षारक्षकाने स्वत:च्या बंदुकीतून गोळ्या झाडत आत्महत्या केली. उत्तम श्रीरामे असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. श्रीरामे राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत होते. या घटनेमुळे प्रशासकीय व पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडत या जवानाने आत्महत्या केल्याचे गडचिरोली पोलिसांनी सांगितले.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांचा येथे शिखरदीप नावाचा शासकीय बंगला आहे. बंगल्याच्या त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाचे सशस्त्र जवान मोठ्या प्रमाणावर तैनात असतात. उत्तम श्रीरामे हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील ताफ्यात तैनात होते. आपली ड्यूटी पूर्ण झाल्यावर श्रीरामे हे विश्रामगृहात गेले. विश्रामगृहात गेल्यानंतर खाटेवर झोपून त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या.

Gadchiroli Collector Residence
Gadchiroli Congress VS BJP : दत्तक गावाकडेही ढुंकुंन बघत नाहीत, मतदारसंघातील जनतेला हे काय न्याय देणार ?

गोळीबाराचा आवाज होताच परिसरात उपस्थित सुरक्षारक्षकांनी विश्रामगृहाकडे धाव घेतली. त्यावेळी श्रीरामे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात दाखल झालेत. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जवानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. श्रीरामे यांनी आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. यासंदर्भात गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कारण कळू शकेल असे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाधिकारी रजेवर

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा हे रजेवर गेले होते. सोमवारीच (ता. 12) आजच ते गडचिरोली येथे रजेवरून परतले. त्यानंतर ते शासकीय बंगल्यावर पोहाेचले. उत्तम श्रिरामे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सुरुवातील श्रीरामे हे राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्रमांक एकमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली गडचिरोली येथे झाली.

गोळीबारापूर्वी स्टेटस

आत्महत्या करण्यापूर्वी उत्तम श्रीरामे यांनी ‘आदमी मरता है, मगर आत्मा नही..’ असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. श्रीरामे यांनी आत्महत्या का केली? याचा सखोल तपास आता सुरू करण्यात आला आहे. गडचिरोली माओवादग्रस्त जिल्हा असल्याने तेथे पोलिस आणि इतर विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. स्वत: प्राणांची रक्षा करत त्यांना शासकीय सेवा द्यावी लागते. अशात गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलाशी संबंधित अशा घटना पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलचेरा तालुक्यातील एका महिला पोलिस शिपायाने आत्महत्या केली होती. एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटनाही अलीकडच्या काळातील आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Gadchiroli Collector Residence
Gadchiroli : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रशासनाची हलगर्जी बेतली गणपुरातील महिलांच्या जीवावर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com