BJP Politic's : सुधीरभाऊंच्या चंद्रपूरमधील अनुपस्थितीचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कारण...

Sudhir Mungantiwar Absent in Chandrapur program: आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर विरोध केला होता. मात्र मुनगंटीवारांच्या विरोधानंतरही त्यांना भाजपत प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातही मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आले नाही, त्यामुळे सुधीरभाऊ भाजपत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis-Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur, 10 January : चंद्रपूर येथे आज लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातील अनेक नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, चंद्रपूरचे असूनही माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीचे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुधीरभाऊंनी (Sudhir Mungantiwar) स्वतः मला फोन केला होता. माझं काही वैयक्तिक काम आहे, त्यामुळे मी कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला चंद्रपूरमध्ये येऊ शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये येत आहात, त्यामुळे माझी इच्छा आहे कार्यक्रमाला येण्याची. पण, माझ्या वैयक्तिक कामामुळे चंद्रपूरला येऊ शकत नाही.

सुधीरभाऊंनी त्यांची काय अडचण आहे, ती मला सांगितली आहे. त्यामुळे कोठेही नाराजीचा विषय नाही. प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक जण हजर राहू शकतो, असं नाही. सुधीर मुनगंटीवार यांची काही वैयक्तिक कारणं होती, त्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, असा दावाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

Devendra Fadnavis-Sudhir Mungantiwar
Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महायुतीच्या 237 आमदारांची शिकवणी; मुंबईत साधणार संवाद!

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पक्षांतर्गत वाद वाढ चालला आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तो दिसून आलेला आहे, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, चंद्रपूर भाजपमध्ये कोणताही वाद नाही. तो तुम्हा पत्रकारांच्या मनात आहे. आमच्या भारतीय जनता पक्षात तर कोणताही वाद नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर विरोध केला होता. मात्र मुनगंटीवारांच्या विरोधानंतरही त्यांना भाजपत प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातही मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आले नाही, त्यामुळे सुधीरभाऊ भाजपत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातूनच ते आजच्या दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्याला आले नाहीत, असे सांगितले जात आहे.

Devendra Fadnavis-Sudhir Mungantiwar
Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफी लटकणार; फडणवीसांच्या घोषणेवर अजितदादांचे प्रश्नचिन्ह; म्हणाले ‘अंथरूण पाहून...’

भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूरमध्ये आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाकडेही सुधीर मुनंगटीवार यांनी पाठ दाखवली होती. आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या सोबत एकत्र येण्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी टाळल्याचे बोलले जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com