Mahavikas Aghadi : काँग्रेस नेत्यांकडून बंडखोराला ताकद; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ramtek Assembly constituency: रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी खासदार श्यामकुमार बर्वे तसेच काँग्रेसचे माजी मंत्री सक्रिय आहेत.
Congress, Shivsena UBT
Congress, Shivsena UBTSarkrnama
Published on
Updated on

Nagpur News: रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसचे नेतेही त्यांच्या प्रचाराला उघडपणे जात आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांना बसण्याची भीती वर्तविली जात आहे. ठाकरेंचे शिवसैनिक प्रचारातून अंग काढून घेतले असल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी रामटेक हा एकमेव मतदारसंघ सोडला होता. त्यावरही सुनील केदारांनी दावा केला होता. मात्र उद्धव ठाकरे ठाम राहिल्याने त्यांनी जिल्हाध्यक्षांना बंडखोरी करण्यास सांगितले. त्यांच्या मागे काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा उभी केली.

Congress, Shivsena UBT
Ajit Pawar : उद्धव ठाकरेंनंतर अजित पवारांच्याही बॅगांची तपासणी, देवेंद्र फडणवीसांचीही...

रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे हेसुद्धा बंडखोरांच्या प्रचाराला जात आहेत. असे असताना केदारांच्या विरोधात कारवाई केली जात नाही. तक्रारांची दखल घेतल्या जात नसल्याने इतर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराला जायचे काही नाही, असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसैनिकांना पडला आहे.

हिंगणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने मागितला होता. युवा सेनेचे प्रदेश पदाधिकारी हर्षल काकडे येथून प्रबळ दावेदार होते. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. युवा सैनिकांची फौज त्यांच्याकडे आहे. वाडी भागात त्यांनी संघटना चांगलीच बांधून ठेवली आहे. मात्र आघाडीमुळे ठाकरे सेनेने हिंगण्यावर दावा सोडला. हा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे.

...तर मविआला फटका

माजी मंत्री रमेश बंग हे हिंगणातून उमेदवार आहेत. त्यांच्यावरही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या मतदारसंघातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास घेतले जात नाही नसल्याचे हर्षला काकडे यांचा आरोप आहे. दोन दिवासांपासून शिवसैनिकांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे.

काटोल मतदारसंघात शिवसेनेचे बळ आहे. या मतदारसंघातून शिवसेना लढत होती. अनिल देशमुख यांच्यामुळे शिवसेनेने काटोलवरचा दावा सोडला. आघाडीचा धर्म पाळला. सावनेरमध्ये मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने केदारांना अटीतटची झुंज दिली होती. याकडे हर्षल काकडे यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे सेनेकेड दुर्लक्ष केले आणि आम्हाला गृहित धरल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा हर्षल काकडे यांनी दिला आहे.

Congress, Shivsena UBT
Satej Patil : 'पढेंगे तो बढेंगे' म्हणत, सतेज पाटलाचा भलताच विश्वास; 'मविआ' 180 जागा जिंकणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com