उपमुख्यमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांचे नाव, अन फडणवीसांचा फोटोही नाही, प्रोटोकॉल तोडला !

कहर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा फोटोच या बॅनरवर नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडे उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला (ZP) प्रचार-प्रसिद्धीसाठी बॅनर पाठविले आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनंतर (Chief Minister) उपमुख्यमंत्री व त्यानंतर इतर मंत्र्यांचे नाव व फोटो असले पाहिजे. परंतु या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे.

हे बॅनर बघितल्यानंतर ग्राम विकास विभागाने प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा उपराजधानीत (Nagpur) सुरू आहे. कहर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा फोटोच या बॅनरवर नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडे उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान केंद्र शासनाकडून राबविल्या जात आहे. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

आधीच विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुपर पॉवर मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नाममात्र आहे, अशी टिका होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या बॅनरवर ग्राम विकास विभागाचे नाव स्पष्ट असून ‘१३ ते १५ ऑगस्ट’ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. ध्वजसंहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे.

Devendra Fadanvis
फडणवीस यांच्या पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादीला पुण्यात धक्का : भाजपमध्ये इनकमिंग सुरू..

राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे एक प्रतिरूप असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे’, असा संदेश दिला आहे. त्याच्या खालच्या बाजुला उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असून फोटो नाही. त्यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोसह उल्लेख आहे. हे बॅनर जिल्हा परिषदेने लावले नसून शासनाकडून आले असल्याचे सत्ताधारी सदस्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com