Uddhav Thackeray : ठाकरे शिंदेंवर मोठा डाव टाकणार? 'त्या' नाराज नेत्यांच्या 'घरवापसी'बाबत दिले 'हे' संकेत

Mahayuti Government Cabinet Expansion : माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही विधिमंडळाच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी मंगळवारी (ता.17) नागपुरात दाखल झाले. त्यांनी विधानभवनात दाखल झाल्यानंतर पहिली भेट 2019 नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच घेतली.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी(ता.17)पार पडला.पण शिंदेंनी त्यांच्या सरकारमधील त्यांच्या मंत्र्‍यांसह अनेक इच्छुकांचा पत्ता कट केला आहे. यामुळे या सर्व नेत्यांमध्ये नाराजीची मोठी लाट पसरली आहे.य नाराजांपैकी काही नेत्यांनी मोठा निर्णय घेण्याचे इशारेही दिले आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या शिंदेसेनेतील नाराजांबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यांच्याद्वारे ठाकरे शिंदेंवर मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही विधिमंडळाच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी मंगळवारी (ता.17) नागपुरात दाखल झाले. त्यांनी विधानभवनात दाखल झाल्यानंतर पहिली भेट 2019 नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच घेतली. या भेटीनं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता त्यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेतील नाराज नेत्यांबाबत सूचक विधान केले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधला.ते म्हणाले, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांचे निरोप येत असून सुधारले तर पुढे बघू असं विधान ठाकरेंनी केले आहेत. त्यामुळे ते अशा नाराज नेत्यांना गळाला लावून पुन्हा एकदा शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी मोठा डाव टाकणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Rajya Sabha Winter Session : सरकार बदलल्यानंतर कुणीही बाहेर दिसणार नाही! संजय सिंह यांनी राज्यसभेतच दिली धमकी

शिवसेनेतील बंडानंतर बंडखोरांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद म्हणजे बंद अशी भूमिका घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी आता नरमाईचा सूर आळवल्याची चर्चा आहे.मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेते संपर्कात आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, नाराज नेत्यांचे फोन येत आहेत.पण त्यांना आता कळतंय,ते कसे आहेत आणि कोण बरोबर आहे. पण अनुभवासारखा गुरू नसतो. तो अनुभवाचा गुरू त्यांना मिळाला आहे. त्याच्यातून त्यांना शिकवण मिळू द्या. मग बघू असे ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 2019 ला अनुभव हा गुरू मला मिळाला आहे. आत्ता यांना गुरू मिळत आहे असंही ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आमच्या कोणत्या नेत्यांनी त्यांच्याकडे संपर्क केला , हे नावासह जाहीर करावं. कारण आम्ही सुध्दा सांगितलंच की, उबाठामध्ये जे लोकं निवडून आले, ते आमच्या संपर्कात असल्याचं आम्ही सांगितलं आहे. पण त्यांच्याकडे अस्वस्थता आहे.त्यांनी जर आमच्या महायुतीतल्या नेत्यांची नावं सांगितली तर आम्ही पण महाविकास आघाडीतील आमच्या संपर्कात असणार्‍या नेत्यांची नावं सांगू, असंही देसाई यांनी स्पष्ट केलं.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Manoj Jarange Patil : 'भुजबळ आपल्या कर्माची फळं भोगतोय, मराठा आरक्षणाचा मारेकरीही..'; जरांगे कडाडले

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून चार काही दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट करण्यात आला. त्यात तानाजी सावंत (Tanaji Sawant) ,दीपक केसरकर,अब्दुल सत्तार,विजय शिवतारे यांच्यास राजेंद्र गावितही नाराज आहे. त्यातच मंत्रिमंडळातून डावलण्याने नाराज भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसह 40 आमदार आणि काही खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं होतं. त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत थेट भाजपसोबत जात सत्तास्थापन केली होती. त्यानंतर शिंदेंच्या सेनेला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हंही मिळालं. यानंतर शिंदे आणि ठाकरेंमधला संघर्ष आणखी टोकदार होत गेला. पण विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 81 जागांपैकी तब्बल 57 जागा जिंकत ठाकरेंना आपलं वजन दाखवून दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com