Rajya Sabha Winter Session : सरकार बदलल्यानंतर कुणीही बाहेर दिसणार नाही! संजय सिंह यांनी राज्यसभेतच दिली धमकी

Sanjay Singh Parliament Constitution : संविधानावरील चर्चेला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत उत्तर दिले.
Sanjay Singh
Sanjay Singh Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी जोरदार टोलेबाजी केली. संविधानवरील चर्चेदरम्यान ते बोलत असताना सत्ताधारी सदस्यांमधून जेल असा आवाज आला. त्यावर संजय सिंह यांचा पारा चढला आणि त्यांनी केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर आता सत्तेत असलेली एकही व्यक्ती बाहेर दिसणार नाही, असा इशारा दिला.

संजय सिंह यांनी संविधानावर बोलत असताना मंगळवारी हे विधान केले. इतर सदस्य बोलत असताना संजय सिंह यांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकले. पण ते बोलत असताना काही सदस्यांनी जेल असे म्हणत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. संजय सिंह हे काही महिन्यांपूर्वीच जेलमधून जामीनावर बाहेर आले आहेत.

Sanjay Singh
Sanjay Singh : 'आप'चे संजय सिंह पुन्हा अडचणीत; आता तब्बल 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला!

सत्ताधारी सदस्यांना प्रत्युत्तर देताना संजय सिंह म्हणाले, ‘अशी धमकी देऊ नका. ज्या दिवसी सत्ता बदलेल त्यादिवशी सत्तेतील एकही व्यक्ती बाहेर दिसणार नाही.’ यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला होता.

दरम्यान, संविधानावरील चर्चेला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत उत्तर दिले. संविधानावरून काँग्रेसवर टीका करताना शाह म्हणाले, ‘पक्षाला एका कुटुंबाची खासगी संपत्ती समजता, संविधानालाही तसेच समजत होता. संविधानासोबत कसा विश्वासघात केला, हे आज या चर्चेच्या माध्यमातून देशाला समजत आहे.’

Sanjay Singh
Amit Shah : महाराष्ट्रात ‘त्या’ चुकीमुळे महाविकास आघाडीचा पराभव! शहांनी राज्यसभेत सांगितले कारण…

शाह यांनी आणबाणीवरूनही काँग्रेसवर टीका केली. तसेच काँग्रेसने घटनेत केलेल्या दुरुस्त्यांवरूनही त्यांनी निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसच्या चार घटनादुरुस्त्यांचे उदाहरण देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही छेडला. तर मोदी सरकारच्या सहा घटनादुरुस्त्या सांगत त्यांनी सरकारने केवळ लोकांच्या हितासाठी हे बदल केल्याचेही स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com