Wadettiwar On Ajit Pawar : आता तेसुद्धा करू लागले ‘नमो नमो’चा ‘टिवटिवाट’, वडेट्टीवारांचे अजित पवारांना टोले !

Ajit Pawar : नरेंद्र मोदी आता अजित पवारांना राज्याच्या तिजोरीची चावी देत आहेत.
Vijay Wadettiwar and Ajit Pawar
Vijay Wadettiwar and Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP did corruption of 70 crores : भाजपचे नेते ज्यांच्याविरोधात गाडाभर पुरावे गोळा करत होते, आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ७० कोटींचा भ्रष्टाचार केला, ही लुटारूंची टोळी आहे, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्याच पक्षातील अजित पवारांना राज्याच्या तिजोरीची चावी देत आहेत. या देशात आता दोन व्यापारी आणि दोन मालकच शिल्लक आहेत, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. (Only two traders and two owners remain)

गडचिरोली येथे काल (ता. १३) विजय वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या स्थानिक (गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा) नेत्यांचाही समाचार घेतला. स्थानिक नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची आठवण त्यांनी जनतेला करवून दिली. भाजप नेत्यांनी रेल्वेचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा कार्यभार स्वीकारताच नागपुरात नागपूर आणि रामटेक (Ramtek) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आढावा सभा घेतली. या सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टिका केली. विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेच त्यांच्या निशाण्यावर असल्याचे बघायला मिळाले. रामटेक लोकसभा लढण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.

Vijay Wadettiwar and Ajit Pawar
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

कर नाही त्याला डर कसली...

गांधी परिवारातील सदस्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावून सहा-सहा तास चौकशी करण्यात आली. पण ते घाबरले नाहीत. मीसुद्धा ईडी, सीबीआयला घाबरत नाही. आम्ही काही चूक केलीच नाही तर कोण आमचे काय बिघडविणार? कर नाही त्याला डर कसली, असेही विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.