वर्धा जिल्हा : आष्टी नगरपंचायतीमध्ये कॉंग्रेस, भाजपच्या जागा घटल्या…

वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) आष्टी नगरपंचायतीमध्ये कॉंग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जागा घटल्या आहेत.
Wardha District
Wardha DistrictSarkarnama

नागपूर : राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आष्टी नगरपंचायतीमध्ये कॉंग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जागा घटल्या आहेत. येथे एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सत्तेची चावी अपक्ष उमेदवारांच्या हातात गेली आहे.

आर्वी नगरपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवारांचे वजन वाढले आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्यांच्या मनधरणीसाठी तालुक्यातील नेते सरसावले आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आष्टी नगरपंचायतीच्या 17 प्रभागाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून काँग्रेसला बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. तर मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला चार जागा कमी मिळाल्या आहे आणि कॉंग्रेसचेही दोन जागांचे नुकसान झाले आहे.

वार्ड क्रमांक १० मधून अपक्ष जनशक्ती संघटनेकडून लढत असलेले जाकीर हुसेन आणि काँग्रेसचे विपीन उमाळे यांना सारखी 145 मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी करण्यात आली. यात अपक्ष जनशक्ती संघटनेचे जाकीर हुसेन विजयी झाले आहे. आष्टी नगर पंचायतच्या १७ जागासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ८, भाजपा २, जनशक्ती ५, बसपा व अपक्ष प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. प्रभाग 10 मध्ये काँग्रेस व जनशक्तीच्या उमेदवाराला समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात जनशक्तीचा उमेदवार विजयी झाला.

Wardha District
वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का, पदाधिकारी व नगरसेवक शिवसेनेत दाखल...

एकुण जागा-17

भाजप- 2

शिवसेना-

काँग्रेस- 8

बसपा - 1

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)- 6

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com