Nitesh Karale : सोशल मीडियावरील एक चूक कराळे मास्तर यांना महागात पडली; पोलिसांनी पहाटेच उचललं

Nitesh Karale Social Media Video Controversy : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे यांना पोलिसांनी अटक केली असून, कराळे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
Nitesh Karale, Sharad Pawar
Nitesh Karale, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Karale Arrested : एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून, कराळे यांना वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलं असून, वर्ध्याच्या राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून नितेश कराळेंची चौकशी सुरू असल्याचे कळत आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कराळे मास्तर यांच्याविरोधात भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्हिडीओत भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल टीका करणारा आणि आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेबद्दल समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते.

हे प्रकरण ताजे असतानाच आता एका समाजाबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अजय शंकरराव डोंगरे यांनी पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

Nitesh Karale, Sharad Pawar
Nitesh Karale Master : नाशिकच्या साधूंविषयी नको ते बोलले, कराळे मास्तरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

नितेश कराळे मास्तर यांनी ३१ जुलै २०२६ रोजी ‘आरक्षण हटाव’ विषयावरील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे.

Nitesh Karale, Sharad Pawar
पवारांची सातव्यांदा भेट, कराळे मास्तर तिकीटासाठी ठाण मांडून | Nitesh karale | Loksabha elelction

या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली होती. तर तक्रारदाराने व्हिडीओची लिंक आणि इतर सर्व पुरावे पोलिसांना दिले होते. या तक्रारीवरून कराळे मास्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com