Shinde ministers controversy: विरोधी पक्षनेत्याचे नाव सुचविणारे ते कोण? उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावले

Opposition leader name issue News : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अजेंड्यावर असल्याचे जाहीर केले. त्यावरून आता पुन्हा जुंपली आहे.
Uddhav thackeray eknath shinde
Uddhav thackeray eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित करून या मागणीला पुन्हा हवा दिली तसेच भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अजेंड्यावर असल्याचे जाहीर केले. त्यावरून आता पुन्हा जुंपली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विजय वडेट्टीवारांची मागणी फेटाळून लावताना महाराष्ट्राचे तुकडे करायचे ही अखंड ठेवायचे हे भाजपने स्पष्ट करावे, असे आवाहन केले. त्यामुळे भाजपची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. यावेळी त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचे नाव सुनावणाऱ्या मंत्र्याला ते आम्ही ठरवू तुम्हा नाही, अशा शब्दांत सुनावले.

Uddhav thackeray eknath shinde
BJP Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा, भाजपचे नेते संतापले; म्हणाले, 'ते फक्त टिकल्या लावतात...'

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. आता महाराष्ट्र अखंड राहणार की तुकडे करणार, हे सरकारने स्पष्ट करावे. हिवाळी अधिवेशन विदर्भाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. मात्र विदर्भासाठी ठोस निर्णय अथवा निधीची तरतूद या सरकारने केली नाही. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रांसाठीच निधी जाहीर केला जात असल्याचे दिसून येते. याबाबत मुख्यमंत्र्यांचे सहकारी असलेल्या नगरविकास आणि अर्थमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Uddhav thackeray eknath shinde
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी नागपुरात बसून हलविली बालेकिल्ल्यातील सुत्रं; महापालिका निवडणुकीसाठी ठरली रणनीती...

महाराष्ट्राच्या इतिहासातले कदाचित हे पहिले अधिवेशन असेल, जिथे दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही. तसे पाहिले तर विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना भास्कर जाधवांच्या नावासह पत्र दिले होते. अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यानंतर विधानपरिषदेत विरोधीपक्षाचे पदही रिक्त झाले. त्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांना पत्र दिले.

Uddhav thackeray eknath shinde
BMC elections 2025 : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुस्लिमबहुल भागातील 18 वॉर्ड ठरणार कळीचा मुद्दा

शुक्रवारी अध्यक्ष आणि सभापतींची भेटही घेतली. विरोधी पक्षनेतेपदावरील निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले. अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावे. विरोधी पक्षनेता कोणाला करायचे हे आम्ही ठरवू सत्ताधारी नाही, असे सांगून काँग्रेस (congress) नेत्याचे नाव सुचवणाऱ्या शिंदे सेनेच्या मंत्र्याला उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

Uddhav thackeray eknath shinde
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com