MLA Kiran Sarnaik: आमदार सरनाईक यांच्या शिवसेना प्रवेशाने बदलणार वाशीमचे राजकीय समीकरण!

Vidarbha Political News : लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील इन्कमिंग वाढविण्यासाठी सर्वच पक्षाकडून भर दिला जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
MLA Kiran Sarnaik
MLA Kiran SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Washim News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता. 4 ) रोजी वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार सरनाईक यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वाशीम जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील इन्कमिंग वाढविण्यासाठी सर्वच पक्षाकडून भर दिला जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला आणखी एक आमदार लागला आहे.

शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज वाशीममध्ये प्रवेश घेतला. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक हे शिवसेना शिंदे गटात आल्याने शिवसेनेची पक्षातील ताकद वाढली आहे, तर वाशीम जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यताही राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

MLA Kiran Sarnaik
Basavraj Patil News : भाजपमध्ये दाखल होताच धाराशिवसाठी बसवराज पाटलांनी दंड थोपटले..

अमरावती विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत वाशीम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी बाजी मारली होती.

किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांचा पराभव केला. त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत अनपेक्षित निकाल त्यावेळी पाहायला मिळाला होता. आता याच सरनाईक यांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहेत किरण सरनाईक?

वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असलेले आमदार किरण सरनाईक हे अकोला-वाशीम हा संयुक्त जिल्हा असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवड केलेल्या मालतीबाई सरनाईक यांचे पुत्र आहेत. अॅड. किरण सरनाईक हे अकोला (Akola) जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिलेले आहेत.

दोन्ही जिल्ह्यांत त्यांची चांगली पकड आहे. वाशीममधील एका नावाजलेल्या आणि मोठ्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्षही आहे. ते स्वतः शिक्षक आहेत. माजी मंत्री बाबासाहेब गोविंदराव सरनाईक यांच्या कुटुंबातील असलेले अॅड. सरनाईक हे सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील 50 वर्षांपासून त्यांचे कुटुंब काँग्रेससोबत जोडलेले होते. अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवार शेखर भोयर यांनी सरनाईक यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. सरनाईक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या व इतर भेटवस्तू वितरित केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कृती भ्रष्ट व्यवहारामध्ये मोडते. त्यामुळे सरनाईक यांची निवड अवैध ठरवून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिकाही भोयर यांनी दाखल केली होती.

...तर राजकीय समीकरण बदलणार!

वाशीम जिल्ह्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले आमदार किरण सरनाईक यांचं पश्चिम विदर्भातील शिक्षण क्षेत्रात चांगलं वजन आहे. आमदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा पराभव केल्यानंतर त्यांची राजकीय ताकद वाढली आहे. त्यामुळे त्यांचा दबदबा वाढला आहे.

किरण सरनाईक हे शिवसेना शिंदे गटात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. एकीकडे भावना गवळी यांना उमेदवारी न मिळण्यावरून चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून किरण सरनाईक यांचाही नावाची चर्चा होऊ शकते.

त्यामुळे आगामी काळात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकमात्र निश्चित वाशीम जिल्ह्यातील राजकीय समीकरण सरनाईक यांच्या येण्याने बदलण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

MLA Kiran Sarnaik
Pune ACB : एसीबीचे एकाच दिवसात दोन 'ट्रॅप'; महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अन् तलाठी जाळ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com