Winter Session 2023 : नागपूर स्फोटावरून विरोधकांचा सभात्याग अन्‌ अजितदादांची नाराजी...; ‘असं वागणं बरं नाही’

Opposition's Walkout : तुम्ही सरकारला आज सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत निवेदन करायला सांगितले. ते आम्ही मान्य केले.
Ajit Pawar & Opposition
Ajit Pawar & Opposition Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील ‘सोलर इंडस्ट्रिज’ कंपनीतील स्फोटावर चर्चा नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या सभात्यागावर नाराजी व्यक्त केली. प्रश्नोत्तराच्या अगोदरही स्फोटावर चर्चा झाली. त्या वेळी तुम्ही सरकारला आज सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत निवेदन करायला सांगितले. ते आम्ही मान्य केले. या घटनेवर बोलण्याची संधी दिली होती, चर्चाही झाली होती. त्यानंतरही वॉकआऊट करणं, आणि अशा पद्धतीने वागणं, बरोबर नाही, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. (Opposition's walkout over Nagpur blast and Ajitdada's displeasure)

नागपूरमधील स्फोटके बनविण्याच्या कंपनीत काल (17 डिसेंबर) स्फोट होऊन नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्या गंभीर घटनेवर चर्चा व्हावी, यासाठी आम्ही 57 अन्वये चर्चा करण्याची मागणी केली, ती तुम्ही फेटाळून लावली. आमदार नाना पटोले यांनी नियमांचा आधार घेऊन सांगितलं तरी तुम्ही ते टाळून कामकाज पुढे नेले. ज्या मतदारसंघात ही घटना घडली, तेथील आमदार अनिल देशमुख यांना तुम्ही बोलू दिलं नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar & Opposition
Assembly Winter Session : संत्र्याच्या मुद्द्यावर सत्तार हतबल; म्हणाले ‘काय करावं बाबा काही कळतंच नाही’

या स्फोटात नऊ लोकांचा जीव गेला आहे. अनेक कामगार उद्‌ध्वस्त झालेत. या राज्यात एवढी गंभीर घटना घडलेली असताना सरकार ऐकायला तयार नसेल तर आम्ही सरकारचा निषेध म्हणून सभात्याग करतो, असे वडेट्टीवार यांनी सांगून सभात्यागाची घोषणा केली. विरोधी सदस्यांनी सरकारच्या निषेधाच्या आणि धिक्काराच्या घोषणा देत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांनी सभात्याग करू नये, अशी विनंती केली. त्यानंतरही विरोधक सरकारविरोधात घोषणा देत सभागृहाबाहेर गेले. विरोधकांच्या या कृत्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी दर्शवली.

Ajit Pawar & Opposition
Kailas Gorantyal: सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या; गोरंट्याल यांचा खळबळजनक दावा, राणे म्हणतात तो 'कुत्ता' कोण?

ते म्हणाले की, सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाच्या अगोदर 57 अन्वये तुम्ही नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख यांना चर्चा करायला परवानगी दिली. त्या वेळी तुम्ही सांगितलं होतं की, स्थगन प्रस्तावावेळी मी तुम्हाला वेळ देणार नाही. आता बोलायचे असेल तर बोला. त्यावेळी त्यांनी ते मान्य केले होते. ते बोलले. त्यानंतर तुम्ही आम्हाला या विषयावर आजचं कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आदेश दिले.

Ajit Pawar & Opposition
Assembly Winter Session : अध्यक्ष महोदय, सरकारकडून तुमचा वारंवार अवमान होतोय; पटोले असे का म्हणाले?

नागपूरमधील घटना गंभीरच आहे. घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि मीही केली. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, स्थानिक आमदार म्हणून अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सभागृह संपण्यापूर्वी निवदेन देण्याचे आम्ही मान्य केले आहे. तरीही स्थगनच्या निमित्ताने पुन्हा तीच चर्चा करायची. तेच बोलायचे आणि पुन्हा सभात्याग करायचा, हे काही बरोबर नाही. तुम्ही त्यांना संधी दिली होती. त्यावर चर्चा झाली होती आणि त्यांनी ती मान्य केली होती, त्यामुळे हे वागणं बरोबर नाही, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली होती.

Ajit Pawar & Opposition
Nagpur Winter Session : अब्दुल सत्तार यांनी विधानसभेतच विरोधकांपुढे हात जोडले....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com