Yavatmal District Bank Election: ‘निष्ठावान शिवसैनिकांच्या बळीची सुरुवात... सावधान!’ : उमेदवारी हुकताच शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नाराजीचा स्फोट

Shiv Sena leader Harihar Linganwar expressed displeasure after being denied a candidature: यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यांच्या व्हॉट्सअॅप पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले.
Shiv Sena leader Harihar Linganwar
Shiv Sena leader Harihar LinganwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Yavatmal District Bank election News: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात उमेदवारी डावलल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘निष्ठावान शिवसैनिकांचा बळीची सुरवात, सावधान यवतमाळ जिल्हा शिवसेना’ अशा आशयाची लिंगणवार यांची व्हॉट्अ‍ॅप पोस्ट रविवारी (ता. 4) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या ग्रुपवर व्हायरल झाली.

या पोस्टमुळे शिवसेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा ऐरणीवर आले असून, कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. लिंगणवार हे पालकमंत्री संजय राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, त्यांनी टाकलेल्या पोस्टसोबत पालकमंत्री राठोड यांच्यासोबतचा फोटोही आहे. त्यामुळे ही पोस्ट केवळ वैयक्तिक नाराजी नसून, जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी लिंगणवार जिल्हा गटातून निवडणुक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव बाजूला पडले आणि शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकाला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्यांना संधी दिली जात असल्याची भावना शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Shiv Sena leader Harihar Linganwar
Maharashtra Drought Relief: दुष्काळी मदतीवर राज्य सरकारकडून २ हेक्टरची मर्यादा; तीन हेक्टरसाठी विशेष निर्णय घेणार?

लिंगणवारांच्या पोस्टने मोठा राजकीय संदेश दिल्याचे मानले जात आहे. ‘निष्ठावान शिवसैनिकांचा बळीची सुरुवात’ या शब्दप्रयोगामुळे पक्षांतर्गत नाराजीचा रोख नेमका कुणाकडे आहे, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून आधीच राजकीय समीकरणे बदलली असताना शिवसेनेतील या नाराजीने महायुतीसमोरील आव्हान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shiv Sena leader Harihar Linganwar
Ravindra Deshmukh: जिल्हा बँकेत ज्यांच्यासाठी ताकद लावली, त्यांचीच माघार : काँग्रेस आमदाराची गोची; ऐनवेळी दुसऱ्या नेत्याला आयात करण्याची वेळ

‘सावधान’चा इशारा कुणाला?

लिंगणवार यांनी पोस्टमध्ये थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, ‘सावधान यवतमाळ जिल्हा शिवसेना’ असा स्पष्ट इशारा दिल्याने पक्षातील आगामी राजकारणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी डावलल्याची खदखद आता उघडपणे व्यक्त झाल्याने या नाराजीचे पुढे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com