Ashok Chavan On Loksabha : लोकसभेच्या जागा वाटपाबाबत 'काँग्रेसचा पॅटर्न' काय? ; अशोक चव्हाण म्हणाले...

Mahavikas Aghadi Loksabha Seat Dispute : "ज्या ज्या भागात काँग्रेसचे स्थानिक नेते..."
Ashok Chavan On Loksabha :
Ashok Chavan On Loksabha :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress News : आगामी लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Election 2024) संदर्भात आता सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi News) तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले असले तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जागावाटप पार पडणार तरी कसे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latast Marathi News)

Ashok Chavan On Loksabha :
Maharashtra Politics : कर्नाटकच्या विजयाने आघाडीला बळ; पवार, ठाकरे अॅक्शन मोडवर : बैठकीत ठरला 'हा' प्लॅन

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरूच आहे. यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आज या संदर्भात काँग्रेसची बैठक पार पडली. जागावाटपाचा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाच काँग्रेसने यासंदर्भात आज बैठक घेतली. बैठक पार पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी बैठकीतील चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली.

Ashok Chavan On Loksabha :
BJP on Brijbhushan Singh: कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणी भाजप हायकमांड अॅक्शन मोडवर; ब्रिजभूषण सिंहांना दिले महत्त्वाचे निर्देश

अशोक चव्हाण म्हणाले, “तिन्ही पक्षांनी जागावाटपाबाबत आपापली भूमिका स्पष्ट करावी. यामुळे जागावाटपावर एक निश्चिती करता येईल. याच अनुषंगाने काँग्रेसकडून जागावाटपाबाबत असा निर्णय घेतला आहे की, त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचं म्हणणं काय आहे, हे जाणणे महत्त्वाचे आहे. देशातील राजकीय परिस्थिती एकंदरीत बदलत आहे. मोदी सरकारच्या वातावरण दिसत आहे. हे कर्नाटक निकालवरून दिसून आलं."

"आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे. जमिनीवरील वस्तुस्थिती काय आहे. मतदारसंघातील लोकांचे देखील म्हणणे काय आहे? तेथील प्रश्न काय आहेत? याचा शोध घेणे सुरू आहे. आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, नंदुरबार या चार लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे”, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Ashok Chavan On Loksabha :
Ahmednagar Politics : ''...तर आनंद द्विगुणित झाला असता!''; नगरच्या नामांतरानंतर आमदार जगतापांनी छेडला विभाजनाचा मुद्दा

“दोन दिवासातील चर्चांवर काय चित्र आहे, याचा अंदाज हळूहळू समोर येत आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांच्या माध्यमांतून दोन दिवस माहिती घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर विषय असतात, तर अनेकदा स्थानिक पातळींवरचे प्रश्न ही महत्त्वाचे ठरतात, लोकल फॉर व्होकल हा पॅटर्न अनुभवला, असे ही अशोक चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.