

No. 1 Marathi Website : डिजिटल न्यूज क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत ई-सकाळने आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. Comscore च्या सप्टेंबर 2026 मधील MMX Multi-Platform अहवालात eSakal.com ने महाराष्ट्रातील डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत ई-सकाळच्या युनिक व्हिजिटर्सची संख्या 5.5 कोटींच्या पुढे गेली आहे.
Comscore च्या अहवालातील आकडेवारीनुसार, मराठी डिजिटल न्यूज विश्वात ई-सकाळने प्रतिस्पर्धी माध्यमांवर मोठी आघाडी घेतली आहे. युनिक व्हिजिटर्सच्या बाबतीत ई-सकाळनंतर न्यूज18 मराठीचा क्रमांक लागतो. न्यूज18 मराठीला 3 कोटी, एबीपी माझाला 2.3 कोटी, महाराष्ट्र टाइम्सला 2.2 कोटी, झी न्यूज मराठीला 2.1 कोटी आणि लोकमत डॉट कॉमला 1.6 कोटी युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत.
ऑनलाइन बातम्यांच्या विश्वात वाचकांना वेगवान आणि विश्वासार्ह माहिती देण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ई-सकाळने आपल्या डिजिटल कंटेंटमध्ये विविधता आणली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींपासून स्थानिक बातम्यांपर्यंत आणि क्रीडा, मनोरंजन, शेती, शिक्षण, आरोग्य, करिअर व लाइफस्टाइल अशा अनेक विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील घडामोडींना दिलेले महत्त्व, नियमित अपडेट्स आणि वाचकांच्या आवडीचे विषय यामुळे ई-सकाळचा वाचकवर्ग विस्तारत आहे. सप्टेंबर 2026 च्या Comscore अहवालातील आकडेवारीतून या डिजिटल पोहोचचे प्रतिबिंब दिसून येते.
सकाळ मीडिया ग्रुपने विश्वासार्ह पत्रकारितेची परंपरा जपत काळानुसार माध्यमांमध्ये बदल स्वीकारले आहेत. प्रिंट माध्यमातून सुरू झालेला प्रवास डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत विस्तारताना तंत्रज्ञान आणि वाचकांच्या बदलत्या अपेक्षांचा विचार करण्यात आला. त्यातून ई-सकाळने ऑनलाइन न्यूज क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
डिजिटल माध्यमांमध्ये वाचकांची संख्या वाढत असताना जाहिरातदारांसाठीही ई-सकाळचे महत्त्व वाढले आहे. 5.5 कोटींहून अधिक युनिक व्हिजिटर्समुळे विविध ब्रँड्सना त्यांच्या जाहिराती आणि उत्पादनांची माहिती मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध होते.
Comscore च्या सप्टेंबर 2026 च्या अहवालातील आकडेवारीने ई-सकाळच्या डिजिटल पोहोचीची आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची नोंद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.